चोरट्यांचा विवाहितेवर बलात्कार

By Admin | Updated: November 3, 2014 05:10 IST2014-11-03T05:10:32+5:302014-11-03T05:10:32+5:30

दोन अज्ञात चोरट्यांनी १९ वर्षे वयाच्या विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना वडकी येथे घडली.

Rape of thieves in marriage | चोरट्यांचा विवाहितेवर बलात्कार

चोरट्यांचा विवाहितेवर बलात्कार

उरुळी कांचन : दोन अज्ञात चोरट्यांनी १९ वर्षे वयाच्या विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना वडकी येथे घडली.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडकी गावात १ नोव्हेंबर रोजी रात्री ७ ते ८ च्या दरम्यान हा प्रकार घडला. ही महिला आपल्या पतीसोबत वडकी येथे राहात असून, त्यांच्या शेजारीच तिचे दीर राहातात. ते दोघे दिवाळीसाठी गावी गेल्याने त्यांच्या घराला कुलूप होते. या महिलेला त्यांच्या पतीचा फोन आला; पण आवाज नीट ऐकू येईना म्हणून ती घराच्या बाहेर आली. तेव्हा त्यांना दीराच्या घराचे दार उघडे दिसले, म्हणून फोन संपल्यावर त्या दीराच्या घरात गेल्या, तेव्हा त्यांना दोन चोरटे उचकापाचक करताना दिसले. त्यांनी त्यांना ‘तुम्ही कोण, येथे काय करता?’ असे विचारले असता, त्या दोघांनी त्यांना पकडून खोलीचे दार लावून घेऊन आळीपाळीने बलात्कार केला व निघून गेले.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये कलम ३७६ अन्वये दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ हे तपास करीत आहेत.

Web Title: Rape of thieves in marriage