वडापुरीत विवाहितेवर बहिणीच्या चुलतदिराचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 02:38 IST2017-07-24T02:38:26+5:302017-07-24T02:38:26+5:30

वडापुरी येथील यात्रेदरम्यान २० वर्षे वयाच्या विवाहितेवर तिच्याच बहिणीच्या चुलतदिराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली

Rape of sister's cousin on marriage | वडापुरीत विवाहितेवर बहिणीच्या चुलतदिराचा बलात्कार

वडापुरीत विवाहितेवर बहिणीच्या चुलतदिराचा बलात्कार

 लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : वडापुरी येथील यात्रेदरम्यान २० वर्षे वयाच्या विवाहितेवर तिच्याच बहिणीच्या चुलतदिराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
नऊ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. दुसऱ्या दिवशी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार व त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. मात्र इंदापूर पोलिसांनी ही माहिती बाहेर पडू दिली नाही.
सूरज ऊर्फ चिंग्या नथुराम शिंदे (रा. बारववस्ती, कांबळेश्वर, बारामती) असे आरोपीचे नाव आहे. विवाहिता बारामती तालुक्यातील सोनगावची रहिवासी आहे. सविस्तर हकीकत अशी की, वडापुरी येथील अंबाजी लिंबाजी देवस्थान हे भटके विमुक्त समाजातील लोकांचे प्रख्यात देवस्थान आहे. दि. १४ जुलै रोजी फिर्यादी विवाहितेला तुझी सासू देवस्थानच्या मागे असल्याचे सांगून दुचाकीवर बसविले. तळ्याजवळील झाडीमध्ये नेले व बलात्कार केला. हा प्रकार कुणाला सांगितलास तर जिवे मारेन अशी धमकी दिली.

Web Title: Rape of sister's cousin on marriage