पुणे : उपचारासाठी आलेल्या तरुणीला गुंगीचे औषध देऊन डॉक्टरने तिच्यावर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार धनकवडी येथे उघडकीस आला आहे. सहकारनगर पोलिसांनी डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे.बलात्कारवेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती. उदय शहा याचा संभाजीनगर येथे दवाखाना आहे. तो होमिओपॅथी डॉक्टर आहे. सप्टेंबर २०१७मध्ये बलात्काराचा प्रकार घडला. सहकारनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जनानंतर दोन दिवसांनी युवती आजारी पडली होती. ती एकटीच डॉक्टरांकडे उपचारासाठी गेली. त्याचा फायदा घेऊन शहा याने तिला इंजेक्शन व एक गोळी दिली. तरुणीला गुंगी आल्यानंतर शहा याने तिच्यावर बलात्कार केला. पिस्तूलचा धाक दाखवून प्रकरणाची वाच्यता केल्यास आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी शहा याने पीडित तरुणीला दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. अत्याचार पीडित तरुणीला त्या वेळी मानसिक धक्का बसला होता. धक्क्यातून सावरल्यानंतर ती तक्रार देण्यास पुढे आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहा याची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरकडून युवतीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 05:51 IST
धनकवडी येथे उपचारासाठी क्लिनिकमध्ये गेलेल्या युवतीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरकडून युवतीवर बलात्कार
ठळक मुद्दे आरोपीची पिस्तुलाचा धाक दाखवत घडलेल्या प्रकाराची कुणाला वाच्यता केली तर युवतीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकीडॉ. उदय शहा यांच्यावर सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल