शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Pune: लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार, धमकी देऊन पैशांची मागणी; गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Updated: January 20, 2024 16:39 IST

याप्रकरणी अहमदनगर येथील तरुणावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत सात ते आठ वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर याबाबत घरच्यांना सांगण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. मात्र, तरुणीने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी तरुणाने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी अहमदनगर येथील तरुणावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सातारा जिल्ह्यातील बावडा येथील २४ वर्षीय तरुणीने शुक्रवारी (दि. १९) सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून प्रज्वल नितीन सिदनकर (२४, मुळ रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २१ जून २०२३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सिंहगड रोड येथील एका लॉजमध्ये घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रज्वल याने फिर्यादी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आपण लग्न करु असे आमिष तरुणीला दाखवले. त्यानंतर २१ जून रोजी आरोपी त्याच्या दुचाकीवरून सिंहगड रोड परिसरातील एका लॉजमध्ये तीला घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर वारंवार सात ते आठ वेळा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने तरुणीला लग्न करण्यास नकार दिला.

तसेच घडलेला प्रकार तिच्या घरच्यांना सांगण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. घाबरलेल्या तरुणीने त्याला पैसे दिले. मात्र, आरोपीकडून सतत पैशांची मागणी होत असल्याने तिने आरोपीला पैसे देण्यास नकार दिला. यानंतर आरोपीने आपल्या संबंधाची माहिती तुझ्या घरच्यांना सांगतो. तुझ्याशी लग्न देखील करणार नाही असे म्हणत शिवीगाळ करुन दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कादबाने करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी