बलात्कार करणा:या नराधमाला अटक
By Admin | Updated: July 5, 2014 23:37 IST2014-07-05T23:37:05+5:302014-07-05T23:37:05+5:30
खडकी-पिंपळगाव (ता़ आंबेगाव) येथील 11 वर्षाच्या शालेय मुलीवर बलात्कार करणा:या नराधमाला मंचर पोलिसांनी आज अटक केली.

बलात्कार करणा:या नराधमाला अटक
मंचर : खडकी-पिंपळगाव (ता़ आंबेगाव) येथील 11 वर्षाच्या शालेय मुलीवर बलात्कार करणा:या नराधमाला मंचर पोलिसांनी आज अटक केली. सुनील बबन उधारे (वय 25, रा़ पारगाव तर्फे खेड) असे आरोपीचे नाव आहे. केवळ रेखाचित्रच्या आधारे पोलिसांनी त्याचा चित्तथरारक पाठलाग करून त्याला जेरबंद केले आह़े
आरोपीने उसाच्या शेतात नेऊन या मुलीवर बलात्कार केला होता़ या घटनेची पोलिसांनी दखल घेऊन तपासाची सूत्रे हलविली़ 3क् जूनला सदर व्यक्ती खडकी येथे आली होती व तिला अनेकांनी पाहिले होत़े हा धागा पोलिसांनी पकडला़ पुणो येथून तज्ज्ञ आणून आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले व त्याच्या आधारे तपास सुरू झाला़
खडकी गावातील विजय वाघमारे हे आजारी असताना त्यांचे सासरे रोकडे हे भेटण्यासाठी आले होत़े त्यांच्यासमवेत या घटनेतील आरोपी आल्याचा माग पोलिसांना मिळाला़. त्या वेळी बलात्कार झालेली मुलगी व तिचा भाऊ गोठय़ात खेळत होत़े आरोपी या मुलीसोबत बराच वेळ बोलत होता. त्याने तिचे नाव, गाव व इतर माहिती विचारून घेतल्याची माहिती पुढे आली़ खडकी येथे काम करणारा नास्तिक वाघमारे यानेही आरोपीला पाहिले होते; मात्र आरोपीबाबत ठोस माहीती मिळत नव्हती़
पोलिसांनी नंतर रोकडे यांच्याकडे तपासासाठी मोर्चा वळविला. जऊळके येथे जाऊन रोकडे यांच्याकडे तपास केला असता, खडकी येथे त्यांच्याबरोबर पारगावतर्फे खेड येथील सुनील बबन उधारे हा आला असल्याचे
निष्पन्न झाले.
पोलिसांनी मग उधारे याच्या घराकडे धाव घेतली, तेव्हा तो पत्नीसह मुंबईला गेल्याचे समजल़े आरोपी फरार होऊ नये, यासाठी पोलिसांनी राजगुरुनगर एसटी आगारात संपर्क साधून सकाळी मुंबईला गेलेल्या बसची माहिती घेतली़ या वेळी दुपारी 12 वाजता कुडे-बोरिवली ही बस मुंबईला गेल्याची माहिती देण्यात आली़ त्या वेळी गाडीचा वाहक विलास काळे याच्याशी संपर्क झाला़ एसटी लोणावळा येथे पोहोचणार होती. मंचर पोलिसांनी लोणावळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप येडे, संजय सुपे, वीरसेन गायकवाड यांना आरेापीचे रेखाचित्र पाठवून घटनेची माहिती दिली़ एसटीमधील आरोपी सुनील उधारे त्याचा मोबाईल बंद करून पळण्याच्या तयारीत होता, त्या वेळी पोलिसांनी खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळ एसटी बस अडवून आरोपीला जेरबंद केल़े
त्याने गुन्ह्याची कबुली दिली आह़े अप्पर पोलीस अधीक्षक विजय मगर, उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव बर्गे, पोलीस निरीक्षक मोहन जाधव तसेच पोलीस आय़ ए. सय्यद, युवराज भोजणो, विकास जगदाळे, प्रशांत वाहील, दत्तात्रय टाकळकर, ए़ के. घोलप यांनी तपास केला़ पोलीस निरीक्षक मोहन जाधव पुढील तपास करीत आहेत़
(वार्ताहर)
4बलात्कार प्रकरणातील आरोपी सुनील बबन उधारे याला काही तासांच्या आत जेरबंद करताना पोलिसांना ग्रामस्थ, तंटामुक्त समिती तसेच प्रसिद्घिमाध्यम यांची मोलाची मदत झाली़ आरोपी जेरबंद व्हावा, अशी लोकभावना होऊन जनतेने मदत केली़ आरोपी सुनील उधारे सराईत असून, तीन वर्षापूर्वी त्याने एक अतिप्रसंग केल्याचा प्रकार समोर आला आह़े तपासात उधारे यांच्याकडून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी व्यक्त केली आह़े