लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:09 IST2020-12-09T04:09:31+5:302020-12-09T04:09:31+5:30

अमोल नाथाजी तिटकारे (वय २५, रा. नायफड ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे. तिटकारे यांचा गाडी व्यवसाय आहे. अल्पवयीन ...

Rape of a minor girl in the lure of marriage | लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अमोल नाथाजी तिटकारे (वय २५, रा. नायफड ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे.

तिटकारे यांचा गाडी व्यवसाय आहे. अल्पवयीन मुलगी एक वर्षापुर्वी बाजारहाट करण्यासाठी वाडा येथे आली होती. दरम्यान तिटकारे यांनी पिडित मुलीची छेडछाड केली होती. झालेला प्रकार घरी सांगू नको मी परत असे करणार नाही असे सांगुन झालेले प्रकरण मिटवले होते. ४ महिन्यापुर्वी पिडित मुलगी डोंगरावर शेळ्या राखण्यास गेली होती. अमोल तिटकारे तिथे जाऊन मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे अमिष दाखवून जबरदस्तीने दोनवेळा बलात्कार केला. तसेच अधुन मधुन पिडित मुलीला तिटकारे भेटत होता. दरम्यान पिडित चार महिण्याची गरोदर राहिल्यांनी हा प्रकार उघडकीस आला. पिडित मुलीच्या आईने खेड पोलिस ठाण्यात तिटकारे विरुद्ध फिर्याद दिली. पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस निरिक्षक वर्षाराणी घाटे करत आहे.

Web Title: Rape of a minor girl in the lure of marriage