चाकण येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:11 IST2021-09-21T04:11:35+5:302021-09-21T04:11:35+5:30

चाकण : मुलीला घरात एकटे असल्याचे पाहून आणि ती अल्पवयीन आल्याचा गैरफायदा घेऊन, दोन नराधमांनी तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने ...

Rape of a minor girl at Chakan | चाकण येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

चाकण येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

चाकण : मुलीला घरात एकटे असल्याचे पाहून आणि ती अल्पवयीन आल्याचा गैरफायदा घेऊन, दोन नराधमांनी तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने केलेल्या अत्याचारातून ती गरोदर राहिली व त्यातून पीडित अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतरच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय पराजो खडे (वय २०, रा. पानसरेवस्ती, ठाकरवाडी, कोळवाडी, घोडेगाव, ता. आंबेगाव), सुनील मधे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. राक्षेवाडी, ता. खेड) या दोघांवर बाल लैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत घडला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून आणि वेळोवेळी वाटेत गाठून वरील दोघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या अत्याचारातून ती गर्भवती राहिली होती. नुकताच तिने एका बाळाला जन्म दिला. याबाबत मुलीच्या आईने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यांनी ती चाकण पोलिसांकडे वर्ग केली आहे. आरोपी अक्षय खडे यास अटक करण्यात आली असून, सुनील मधे फरार आहे. त्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूनम जाधव अधिक तपास करत आहेत.

Web Title: Rape of a minor girl at Chakan