सोशल मीडियावरील ओळखीतून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:14 IST2021-08-24T04:14:07+5:302021-08-24T04:14:07+5:30

पुणे : सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर ...

Rape of a minor girl from an acquaintance on social media | सोशल मीडियावरील ओळखीतून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सोशल मीडियावरील ओळखीतून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अरुण सोमनाथ शिंदे (वय २१, रा़ पिंपरी, नातेपुते, सोलापूर) याला अटक केली आहे.

याप्रकरणी एका १७ वर्षांच्या मुलीने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल २०२० ते जुलै २०२१ पर्यंत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी मूळची उत्तर प्रदेशातील राहणारी आहे. तिचे इन्स्ट्राग्रामवरून आरोपी अरुण शिंदे याच्याबरोबर ओळख झाली होती. अरुण शिंदे याने या मुलीला ते लग्न करणार असल्याचे सांगून गेल्या ६ महिन्यांपासून वेगवेगळ्या लॉजवर तसेच भाड्याच्या खोलीत घेऊन जाऊन तिच्याशी शारीरिक संबंध केले. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अरुण शिंदे याला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करीत आहेत.

Web Title: Rape of a minor girl from an acquaintance on social media