शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन त्या नराधमाने केला होता तिचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 13:34 IST

४ जुलैच्या रात्री ६ वर्षीय पीडित मुलीचा मृतदेह ताडीवाला रस्त्यावरील एका टेम्पोच्या सीटमध्ये तिचा मृतदेह आढळला होता.

ठळक मुद्देशवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब समोर , ताडीवाला रस्त्यावरील टेम्पोत आढळला होता मृतदेह,

पुणे : ताडीवाला रस्त्यावर टेम्पोमध्ये आढळून आलेल्या सहा वर्षीय चिमुकलीच्या मृतदेहावर बलात्कार झाल्याची धक्कादायक बाब शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गणेश बसवराज गायकवाड (वय २०, रा. ताडीवाला रस्ता, मूळ. कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे. या नराधमावर बलात्कार (भादवी ३७६) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी गायकवाड याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.     सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  ४ जुलैच्या रात्री ६ वर्षीय पीडित मुलीचा मृतदेह ताडीवाला रस्त्यावरील एका टेम्पोच्या सीटमध्ये तिचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला याप्रकरणी गळा आवळून खून गेल्याची तक्रार देण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी गायकवाड याला अटक केली आहे. टेम्पोचा दरवाजा वाजवून त्रास दिल्याने पीडितेचा खून केल्याचे आरोपीने सांगितले होते. मात्र, तिच्यावर अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले आहे. यावरून त्याने अत्याचार करून तिचा खून केल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यावर बलात्कार, बाललैंगिकच्या वाढीव कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गायकवाडला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. बंडगार्डन पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एस. ए. जमदाडे तपास करत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणेRapeबलात्कारMurderखूनPoliceपोलिस