केस मिटविण्यासाठी मागितली ५० लाखांची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:51+5:302020-11-28T04:07:51+5:30
पुणे : केस मिटवायची असल्यास दोन दिवसांत ५० लाख रूपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांनाही केसमध्ये अडकवतो अशी धमकी देऊन ...

केस मिटविण्यासाठी मागितली ५० लाखांची खंडणी
पुणे : केस मिटवायची असल्यास दोन दिवसांत ५० लाख रूपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांनाही केसमध्ये अडकवतो अशी धमकी देऊन खंडणी मागणाऱ्याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा अवधूत चव्हाण आणि सचिन जाधव (रा. संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वैजयंती भुताळे (वय ४७, रा. दळवीनगर, नऱ्हे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजयंता कुटुंबीयांसह नऱ्हे परिसरात राहायला आहेत. त्यांच्याविरूद्ध एक गुन्हा दाखल आहे. संबंधित प्रकरण मिटविण्यासाठी आरोपी मीरा यांनी सचिनला वैजयंता यांच्या घरी पाठविले. त्यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत आहेत.