अक्षय तृतीयेला सोनेखरेदीसाठी रांका ज्वेलर्सची खास आॅफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:11 IST2021-05-07T04:11:07+5:302021-05-07T04:11:07+5:30

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांची सोने खरेदीची परंपरा आहे. ही परंपरा या काळातही अखंडित राहावी यासाठी रांका ज्वेलर्सचा सज्ज आहे. ...

Ranka Jewelers' special offer to buy gold for Akshay III | अक्षय तृतीयेला सोनेखरेदीसाठी रांका ज्वेलर्सची खास आॅफर

अक्षय तृतीयेला सोनेखरेदीसाठी रांका ज्वेलर्सची खास आॅफर

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांची सोने खरेदीची परंपरा आहे. ही परंपरा या काळातही अखंडित राहावी यासाठी रांका ज्वेलर्सचा सज्ज आहे. यासाठी रांका ज्वेलर्सने १ ते ३१ मे या कालावधीसाठी प्राईज प्रोटेक्शन आॅफर जाहीर केली आहे. या आॅफर अंतर्गत ग्राहकांनी आजच्या सोन्याच्या दरात दागिन्यांची बुकिंग करायची आहे. शोरूम खुली होतील तेव्हा ३१ जुलै २०२१ पर्यंत त्याच दराने दागिन्यांची डिलिव्हरी ग्राहकांना देण्यात येणार आहे.

डिलिव्हरीच्या दिवशी सोन्याचा दर कमी झालेला असेल तर ती फरकाची रक्कमही ग्राहकांना परत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांसाठी घडणावळ फक्त रुपये ३४९ प्रतिग्रॅमपासून पुढे ठेवण्यात आली आहे. ही आॅफर केवळ २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठीच लागू आहे. या व्यतिरिक्त २४ कॅरेट सोन्यातील नाणी व वळी देखील रांका ज्वेलर्सद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. रांका प्राईज प्रोटेक्शन आॅफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना रांका ज्वेलर्सच्या कोणत्याही शोरूममध्ये फोनद्वारे बुकिंग करता येईल, अशी माहिती रांका ज्वेलर्सकडून देण्यात आली आहे.

(वा.प्र)

Web Title: Ranka Jewelers' special offer to buy gold for Akshay III