रांका ज्वेलर्सचे बंडगार्डनला दालन
By Admin | Updated: March 20, 2015 01:01 IST2015-03-20T01:01:31+5:302015-03-20T01:01:31+5:30
रांका ज्वेलर्सच्या बंडगार्डन रस्त्यावरील नवीन दालनाचे उद्घाटन रांका ज्वेलर्सची ब्रँड अॅम्बेसिडर व सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांच्या हस्ते करण्यात आले.

रांका ज्वेलर्सचे बंडगार्डनला दालन
पुणे : रांका ज्वेलर्सच्या बंडगार्डन रस्त्यावरील नवीन दालनाचे उद्घाटन रांका ज्वेलर्सची ब्रँड अॅम्बेसिडर व सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, रांका ज्वेलर्सनी तयार केलेल्या तब्बल ५१ लाखांच्या सोन्याच्या पैठणीचेही अनावरण करण्यात आले.
या वेळी रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका, पुखराज रांका, ओमप्रकाश रांका, अनिल रांका, वास्तुपाल रांका, तेजपाल रांका, रमेश रांका आणि रांका कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. रांका ज्वेलर्सतर्फे पहिल्यांदाच सोन्याची पैठणी तयार करण्यात आलेली आहे.
पैठणीला सुमारे दीड किलो सोन्याने मढविण्यात आले असून, तिची किंमत तब्बल ५१ लाख रुपये आहे. रांका ज्वेलर्सने या आधी तयार केलेल्या सोन्याच्या शर्टला गिनीज बुकमध्ये स्थान मिळाले होते.
या सोन्याच्या पैठणीचीदेखील गिनीज बुकमध्ये नोंद होऊन तिला जागतिक स्तरावर मान्यता मिळेल, असा विश्वास रांका कुटुंबीयांनी व्यक्त केला. दालनाच्या उद्घाटनावेळी बोलताना विद्या बालन म्हणाली, की मला रांका ज्वेलर्सची ब्रँड अॅम्बेसिडर असल्याचा अभिमान आहे. मला रांका ज्वेलर्सने बनविलेले सर्व प्रकारचे दागिने खूप आवडतात आणि ही खास तयार केलेली सोन्याची पैठणी तर फार अप्रतिम आहे. त्यांच्या या नवीन दालनासाठी माझ्या शुभेच्छा आणि सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
तिला तिच्या आवडत्या दागिन्याविषयी विचारले असता ती म्हणाली, ‘‘हास्य हाच स्त्रीचा खरा दागिना आहे.’’
(वा. प्र.)