रांजणगाव सांडस; बिबट्याची दहशत
By Admin | Updated: January 25, 2017 23:44 IST2017-01-25T23:44:21+5:302017-01-25T23:44:21+5:30
येथे व आसपासच्या परिसरातील शितोळेवस्ती, पठारेवस्ती, मोरमळा या भागात बिबट्याने धुमाकूळ घालून मेढपाळ व्यावसायिकांसह

रांजणगाव सांडस; बिबट्याची दहशत
रांजणगाव सांडस : येथे व आसपासच्या परिसरातील शितोळेवस्ती, पठारेवस्ती, मोरमळा या भागात बिबट्याने धुमाकूळ घालून मेढपाळ व्यावसायिकांसह नागरिकांची झोप उडविली आहे. भीमा नदीच्या पट्ट्यामध्ये ऊसक्षेत्राचे प्रमाण जास्त असल्यामुळे बिबट्याला लपण्यास व परिसरात विहार करण्यास मोकळे मैदान असल्यामुळे हे बिबटे नागरिकांना पाणंद रस्त्यावरून
तो मुख्य रस्त्यावर सकाळ रात्री फिरताना दिसत आहे.
बापूराव कोळपे हे आपल्या मेढ्यांना टोकर वाटेवरून जात असताना पाठीमागील मेंढीला बिब्याने घट्ट दाबून धरले. मेंढ्या का बुजल्या म्हणून पाठीमागे पाहिले असता बिबट्याने मेंढीला पकडून उसाच्या क्षेत्रात ओढून चालविल्याचे दिसले. बाकीच्या मेंढ्या पळत सुटल्या. (वार्ताहर)