शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कांचन कुल यांच्यासाेबत रंजना कुल यांनी सुद्धा भरला बारामतीतून अर्ज कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 19:09 IST

कांचन कुल यांच्या सासू आणि राहुल कुल यांच्या आई माजी आमदार रंजना कुल यांनी आज बारामतीतून अर्ज दाखल केला आहे.

पुणे : बारामती मतदार संघामध्ये यंदा माेठी लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या विद्यमन खासदार सुप्रिया सुळे यांच्या विराेधात भाजपकडून कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल सुप्रिया सुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला तर परवा कांचन कुल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज कांचन कुल यांच्या सासू आणि राहुल कुल यांच्या आई माजी आमदार रंजना कुल यांनी आज बारामतीतून डमी अर्ज दाखल केला आहे. 

कांचन कुल या पहिल्यांदाच बारामतीतून लाेकसभेची निवडणुक लढवत आहेत. रासपचे दाैंडचे आमदार राहुल कुल यांच्या त्या पत्नी आहेत. कुल यांचं माहेर बारामती आहे. त्यांचा आणि राहुल कुल यांच्या विवाहासाठी सुनेत्रा पवार यांनी मध्यस्ती केली हाेती. सुप्रिया सुळे यांना टक्कर देण्यासाठी भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. परवाच त्यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. दरम्यान कांचन कुल यांच्या अर्जात काही त्रुटी आढळल्यास आणि ताे अर्ज बाद झाल्यास दुसरा उमेदवार काेण असा प्रश्न निर्माण हाेऊ नये म्हणून कुल यांच्या सासू रंजना कुल यांनी देखील आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  दरम्यान कांचन कुल यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला तर रंजना कुल यांना भाजपाच्या तिकीटावरुन निवडणुक लढवता येणार आहे. 

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक