संतोषनगरच्या सरपंचपदी रंजना कड
By Admin | Updated: May 10, 2017 03:41 IST2017-05-10T03:41:21+5:302017-05-10T03:41:21+5:30
संतोषनगरच्या सरपंचपदी रंजना कड तर उपसरपंचपदी मोहन कड यांची निवड झाली आहे. सोमवारी (दि. ८) प्रत्यक्ष मतदान करून निवड करण्यात आली.

संतोषनगरच्या सरपंचपदी रंजना कड
लोकमत न्यूज नेटवर्क
वाकी बुद्रुक : संतोषनगरच्या सरपंचपदी रंजना कड तर उपसरपंचपदी मोहन कड यांची निवड झाली आहे. सोमवारी (दि. ८) प्रत्यक्ष मतदान करून निवड करण्यात आली.
एक महिन्यापूर्वी संतोषनगर गावचे सरपंच तसेच उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव ६ सदस्यांनी आणला होता. इतर सदस्यांनाही पदावर काम करण्याची संधी मिळावी म्हणून हा ठराव आणण्यात आला होता.
अविनाश मलघे, मोहन कड, सुरेखा विरकर, रंजना कड, रंजना महिपती कड, मीरा कड या सहा सदस्यांनी या सर्व निवडीच्या प्रक्रियेत सहभाग दाखवून गावच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देत आम्ही काम करू असे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच रंजना कड तसेच उपसरपंच मोहन कड यांनी दिले. तसेच निवडप्रक्रिया शांततेत पार पडली. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे व सदस्यांचे डी. बी. उगले यांनी आभार मानले.