शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

दुपारनंतरच लागल्या मतदानासाठी रांगा

By admin | Updated: February 22, 2017 03:31 IST

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १८, १९ व २० या पुणे शहराच्या पूर्व भागात सरासरीने

पुणे : भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १८, १९ व २० या पुणे शहराच्या पूर्व भागात सरासरीने ५०.३६ टक्के मतदान झाले. मात्र, हा उत्साह नेहमीप्रमाणे दुपारी ४ नंतर सुरू झाला. सकाळच्या सत्रात साधारण ११ पर्यंत सरासरी १६ टक्केच मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी हा ओघ थोडा ओसरला व ४ नंतर बहुसंख्य मतदान केंद्रांवर रांगा लागू लागल्या व सायंकाळी साडेपाचला मतदान बंद झाल्यानंतर या गर्दीला केंद्रामध्ये घेऊन त्यांचे मतदान सुरू ठेवणे केंद्राधिकाऱ्याला नियमाप्रमाणे भाग पाडले.मतदान प्रक्रिया संपल्यानंतर उशिरा मिळालेल्या आकडेवारीनुसार प्रभाग क्रमांक १८ मध्ये ५६.४९ टक्के, १९ मध्ये ४०.३३ टक्के व २० मध्ये ५३.५४ टक्के मतदान झाले. मतदान सुरू असताना कुठेही मोठी गडबड, गोंधळ किंवा तणावाचे प्रसंग निर्माण झाले नाहीत. हे तिन्ही प्रभाग मिळून २३५ मतदान केंद्रे होती. त्यातही प्रभाग क्रमांक २० (ताडीवाला रस्ता-ससून हॉस्पिटल) व प्रभाग क्रमांक १९ (लोहियानगर-कासेवाडी)मध्ये चुरस असल्याने तिथे गडबड होईल, असा प्रशासनाचा अंदाज होता. त्यामुळे या दोन्ही प्रभागांमधील काही ठिकाणी जादा पोलीस तैनात करण्यात आले होते. मतदान केंद्राबाहेर गर्दी झाली, की पोलीस या गर्दीला हटवत होते. प्रमुख उमेदवार कार्यकर्त्यांसह आले, की वरिष्ठ अधिकारी थेट त्यांनाच कार्यकर्त्यांसमवेत गर्दी करून थांबू नये, अशी विनंती करीत होते. प्रभाग क्रमांक १९ लोहियानगर येथील मतदान केंद्रांमध्ये सकाळच्या सत्रात कमी गर्दी होती. सावित्रीबाई फुले प्रशाला, महर्षी हरकादेव हायस्कूल, गोल्डन ज्युबिली स्कूल तसेच परिसरातील अन्य शाळांमध्ये मतदान केंद्रे होती. प्रशासनाच्या वतीने या परिसरातील मतदारांना सोमवारी रात्री उशिरापर्यंत मतदान स्लिपा देण्यात आला. बहुतेक नागरिकांकडे प्रशासनाने दिलेल्या या चिठ्या होत्या. त्यावर केंद्र क्रमांक तसेच अनुक्रमांकही असल्यामुळे मतदारांना केंद्र सापडण्यास अडचण येत नव्हती. प्रमुख उमेदवार कार्यकर्त्यांसह प्रभागातील बहुतेक मतदान केंद्रांना भेट देऊन माहिती घेताना दिसत होते.प्रभाग क्रमांक २० मध्येही सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग कमी होता. रेल्वे कम्युनिटी सेंटर येथील मोठ्या अंगणवाडीत चार मतदान केंद्रे पत्र्याच्या शेड टाकून तयार करण्यात आली होती. बरेच मतदार त्यांच्या लहान मुलांसह मतदानाला आल्या होत्या. ही मुले अंगणवाडीतील खेळणी खेळत होती व त्यांचे पालक मतदानासाठी रांगेत उभे होते. प्रभागातील लिट्ल एंजल स्कूल व अन्य काही केंद्रांमध्येही सायंकाळी ४ नंतरच मतदानासाठी गर्दी होऊ लागली. मतदानाची वेळ संपल्यानंतरही काही केंद्रांमध्ये रांग होती. त्या सर्वांना आत घेऊन मतदान करून घेण्यात आले. त्यामुळे या केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया सुमारे अर्ध्या तासाने बंद झाली. साडेपाचनंतर काही मतदार आले होते; पण पोलिसांनी त्यांना केंद्राच्या आत सोडले नाही. निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी सर्व मतदान केंद्रांवर तीन कर्मचारी फक्त मतदारांना माहिती देण्यासाठी म्हणून नियुक्त केले होते. त्यांचाही बहुतेक ठिकाणी मतदारांना नाव शोधून देण्यास उपयोग होत होता. सकाळी व दुपारीही पाटील यांनी तिन्ही प्रभागांतील गर्दीच्या मतदान केंद्रांना भेट दिली व केंद्राध्यक्षांकडून मतदानाची माहिती घेतली. दुपारनंतर बहुतेक ठिकाणी मतदानाचा वेग वाढला. त्या वेळी त्यांनी राखीव ठेवलेला कर्मचारी वर्ग या मतदान केंद्रावर पाठवला. त्यामुळे या केंद्रावरील गर्दीचे नियोजन चांगल्या पद्धतीने झाले. प्रभागात ५५ टक्के; बोगस मतदानाच्या घटनापुणे : येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १, २ व ६ मध्ये बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसून आला. या तीन प्रभागांमध्ये सुमारे ५५ टक्के मतदान झाले. तुरळक ठिकाणी घडलेल्या बोगस मतदानाच्या घटनांचा अपवाद वगळता सर्व प्रभागात शांततेत मतदान पार पडले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होऊनही दुपारी तीनपर्यंत मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसून येत होती. मात्र, साडेतीननंतर शेवटच्या क्षणी साडेपाचपर्यंत काही मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येने येऊन मतदारांनी हक्क बजावला.महापालिका प्रशासनाने प्रभाग क्रमांक १, २ व ६ मध्ये एकूण २६८ मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली होती. येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या बाबूराव टिंगरे विद्यालय, विठ्ठलराव गाडगीळ, सावित्रीबाई फुले विद्यानिकेत, समता विद्या मंदिर नारायण मोझे, गेनबा सोपानराव मोझे, जनता विद्यालय, नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक शाळा, सीताराम देवकर मनपा प्राथमिक विद्यालय, ट्रिनिटी हायस्कूल, विद्यानिकेतन शाळा, भाऊसाहेब जाधव शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, आंबेडकर कॉलेज आणि डेक्कन कॉलेजजवळील केंद्रीय विद्यालय आदी केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली. मतदानानिमित्त सर्व शासकीय कार्यालयांना सुटी देण्यात आली होती. मात्र, खासगी कंपन्यांना सुटी असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कामावर जाण्याची घाई होती. त्यामुळे मतदानाला सुरुवात झाल्यानंतर आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक तरुण-तरुणींनी सकाळीच मतदान केले. सकाळी ७.३० पासून ११.३० ेपर्यंत धिम्या गतीने मतदान सुरू होते. दुपारी १२ ते दीडपर्यंत मतदानाची टक्केवारी काही प्रमाणात वाढलेली दिसून आली. त्यानंतर तीनपर्यंत पुन्हा मतदारांची संख्या रोडावली. परंतु, दुपारी ३.३० नंतर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडलेल्याचे दिसून आले.सकाळी मतदानाची टक्केवारी कमीच दिसत होती. त्यात सकाळी ७.३० ते ११.३० वाजेपर्यंत येरवडा जेल रस्त्यावरील कॉमर्स झोनजवळील सफाई कामगारांच्या मुला-मुलींची शाळा या केंद्रावर केवळ ४ ते ६ टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. मात्र, एस.एस. इंग्लिश मीडियम स्कूल या केंद्रावर दुपारी ३.३० पर्यंत एका बूथवर ४९ टक्के मतदान झाले होते. डेक्कन कॉलेजजवळील केंद्रीय विद्यालयात १९ मतदान केंद्रे होते. त्यामुळे या केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी दिसून आली. त्याचप्रमाणे येथे ५५ ते ६१ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)धनकवडीत ५७ टक्के मतदानपुणे : धनकवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या ३८, ३९ आणि ४० या प्रभागांत सरासरी ५७.३१ टक्के मतदान झाले असून, धनकवडी-आंबेगाव पठार या ३९ प्रभागात सर्वाधिक ६०.१८ टक्के मतदान झाले. बोगस मतदानाच्या आरोपावरून दोन मतदान केंद्रांवर झालेल्या गोंधळाचा अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. धनकवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३८, ३९ व ४० या प्रभागांत एकूण १ लाख ७६ हजार ३७२ मतदार आहेत. त्यांतील १ लाख १ हजार १९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्रमांक ३८ या बालाजीनगर-राजीव गांधीनगर या प्रभागातील ६५ हजार ७ मतदारांपैकी ३४ हजार ३५१, प्रभाग क्रमांक ३९ या धनकवडी-आंबेगाव पठार प्रभागातील ५० हजार १५२ मतदारांपैकी ३० हजार १८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्रमांक ४० येथील आंबेगाव दत्तनगर-कात्रज गावठाणामधील ६१ हजार ४१३ मतदारांपैकी ३६ हजार ६५७ मतदारांनी मतदान केले. सकाळी साडेसात ते साडेनऊदरम्यान मतदारांचा ओघ खूपच कमी होता. सर्वच केंद्रांवर सुमारे ९ ते १० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सकाळी साडेअकरा ते दुपारी दीडपर्यंत मतदारांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला. दुपारी दीडपर्यंत २२ ते २७ टक्के मतदानाची नोंद झाली. उन्हाचा तडाखा वाढला असला, तरी मतदार दुपारच्या सत्रातही मतदानासाठी बाहेर पडताना दिसत होते. दरम्यान, विविध पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी घराबाहेर घेऊन येताना दिसत होते. (प्रतिनिधी)जुन्या पेठांच्या ३ प्रभागांमध्ये ६० टक्के मतदानपुणे : कसबा- विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या ३ प्रभागांमध्ये सकाळी ७.३० ते दुपारी १.३० या ६ तासांमध्ये ३५.५० टक्के मतदान झाले होते. दुपारी साडेतीनपर्यंतच्या २ तासांमध्ये त्यात फक्त १२.७ टक्के वाढ होऊन ८ तासांच्या मतदानाची टक्केवारी ४८.२० झाली. शेवटच्या दोन तासांत एकूण ६०.६१ टक्क्यांपर्यंत मतदान पोहोचले. सदाशिव पेठेचा काही भाग, पूर्ण शनिवार पेठ आणि नारायण पेठ, रास्ता, नाना पेठ, रविवार पेठ, गणेश पेठ यांचा बहुतांश भाग आणि नवी पेठ, पर्वती पायथा अशा जुन्या पुण्याच्या पेठांचा व वस्त्यांचा समावेश या ३ प्रभागांमध्ये होता. सकाळी मतदानाचा उत्साह होता. अनेक केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. संवेदनशील प्रभागामध्ये काहीशा तणावपूर्ण शांततेमध्ये मतदान सुरू असल्याचे दिसत होते. उमेदवारांचे समर्थक मतदान केंद्रांकडे जाणाऱ्या मतदारांवर नजर ठेवून असल्याचे चित्र रास्ता, नाना व रविवार या पेठांत दिसत होते. (प्रतिनिधी)शाईची तक्रारप्रभाग क्रमांक १५ मध्ये आदर्श विद्यालय शाळेतील एका केंद्रामध्ये सकाळी नऊनंतर मतदानासाठी आलेल्या एका महिलेने बोटावरची शाई पुसली जात असल्याची तक्रार केली. केंद्राध्यक्ष डॉ. श्रीकांत जगताप याबाबत म्हणाले, ‘‘महिला स्वयंपाक करुन मतदानासाठी येतात. बोटाला तेलाचा अंश असल्यास शाई पुसट लागते. कधीकधी एखाद्या पेनमधील शाई बोटावर नीट उमटत नाही. संबंधित महिलेच्या तक्रारीत तथ्य नाही.’’बोगसचा दावा फेटाळलायाच केंद्रावर मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठवयीन महिलेने आपल्या नावावर कोणी तरी मतदान केल्याची तक्रार केली. ही महिला शुक्रवार पेठेतील रहिवासी असल्या, तरी सध्या पद्मावती येथे राहतात. केंद्राध्यक्षांनी मात्र असा काही प्रकार झाला नसल्याचा दावा करून मतदार स्लीप पाहून क्रमांकावरून तपासणी केली जाईल, असे सांगितले. ६४ हजार पुरुषांचे मतदानएकूण ६४,८२३ पुरुषांनी व ६०,३८४ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग १५ मध्ये २१,२०१ महिला आणि २२,५७६ पुरुषांनी मतदान केले. प्रभाग १७ मध्ये १९,४१७ महिलांनी, तर २२,१४६ पुरुषांनी मते दिली. तर, प्रभाग २९ मध्ये १९,७६६ महिला आणि २०,१०१ पुरुष मतदारांनी मतदान केल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. १० तासांत ६०.६१ टक्के मतदानासाठी असलेल्या १० तासांमध्ये शनिवार- सदाशिव पेठ ( प्रभाग क्रमांक १५) मध्ये सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत ६२.५१ टक्के, रास्ता पेठ -रविवार पेठ (प्रभाग क्रमांक १७) मध्ये ५९.४३ टक्के आणि पर्वती-नवी पेठ (प्रभाग क्रमांक २९)मध्ये ५९.८४ टक्के झाले.ग्रामीण हद्दीतील मतदानावर घेतला आक्षेपदत्तनगर येथील प्रभाग क्रमांक ४०मधील शनिनगर परिसरातील एका केंद्राजवळ शहर व ग्रामीणची हद्द जोडून आहे. यामुळे काही सोसायट्या ग्रामीणच्या हद्दीत येतात. ग्रामीणच्या हद्दीत येत असलेल्या सोसायट्यांतील नागरिकांची नावे महापालिकेच्या हद्दीत आल्याचा आरोप एका उमेदवाराने केला. सुमारे दोन ते तीन हजार मतदारांची नावे अशा प्रकारे शहरात आल्याचा दावा त्याने केला. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी खातरजमा करून ही बाब फेटाळून लावली. यानंतर गोधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पांगविले. दहा ते पंधरा मिनिटांतच येथील परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणाखाली आणली. केंद्राध्यक्षांची मदत : चहा-बिस्किटांची व्यवस्थाबहुतेक केंद्रांमध्ये मतदान केंद्राध्यक्षाला मतदाराला कसे मतदान करावे, हे सांगावे लागत होते. यावर उपाय म्हणून काही सेंट थॉमस स्कूलमधील एका केंद्राध्यक्षांनी त्यांच्या एका सहायकला रांगेत उभे असलेल्या मतदारांनाच कसे मतदान करायचे ते सांगण्यास सुरुवात केली. याचा उपयोग झाला व या केंद्रातील मतदानाचा वेग वाढला. या केंद्राध्यक्षांचे संजय पाटील यांनी कौतुक केले.लिट्ल एंजल स्कूलमधील मतदान केंद्रात विजयालक्ष्मी घोलप या व्हीलचेअरवर बसून मतदानासाठी आल्या होत्या. मुलाच्या साह्याने त्यांनी मतदान केले. आजारी असतानाही आईला मतदान करायचे होते; त्यामुळे घेऊन आलो, असे त्याने सांगितले.पाटील यांनी भेट दिलेल्या अनेक मतदान केंद्रांतील कर्मचाऱ्यांनी सकाळपासून साधा चहाही मिळाला नसल्याची तक्रार केली. पाटील यांनी झोनल आॅफिसरला सांगून त्या कर्मचाऱ्यांना चहा-बिस्किटे देण्याची व्यवस्था केली.तिन्ही प्रभागांतील मतदान केंद्रांत तसेच गर्दीच्या ठिकाणी त्यातही गंज पेठ, लोहियानगर, मोमीनपुरा या भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.