‘डी.वाय.’मध्ये रंगला फ्युजन महोत्सव
By Admin | Updated: March 22, 2017 03:27 IST2017-03-22T03:27:59+5:302017-03-22T03:27:59+5:30
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालयात ‘फ्युजन’ हा सांस्कृतिक महोत्सव

‘डी.वाय.’मध्ये रंगला फ्युजन महोत्सव
निगडी : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालयात ‘फ्युजन’ हा सांस्कृतिक महोत्सव स्पर्धात्मक उपक्रमांनी उत्साहात पार पडला.
महिलांचा सन्मान यावर आधारित हा महोत्सव होता. महोत्सवांतर्गत पारंपरिक दिन साजरा करण्यात आला. फेस पेंटिंग, अॅड मेड स्पर्धा, बिझिनेस क्वीझ, भीत्तिचित्र, सोलो सॉंग, सोलो डान्स, ग्रुप डान्स
व अंताक्षरी स्पर्धा घेण्यात
आल्या. यानिमित्त आयोजित ‘ई-बझार’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
लाभला.
व्यवस्थापकीय संचालक ओ. पी. सिंग, संस्थेचे कार्यकारी पी. व्ही. सी. पाटील, प्रा. डी. आर. करनुरे, डॉ. जयसिंह पाटील, संचालिका डॉ. सूर्या रामदास आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी कलागुणांच्या अविष्कार करून उपस्थितांची मने जिंकली.(वार्ताहर)