शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पुण्यातील गोळीबार मैदान व ईदगाह मशिदेत नमाज पठण करत रमजान ईद उत्साहात साजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 19:33 IST

नवीन पोशाख परिधान करून लहान मुले, मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने आले होते.

ठळक मुद्देराजकीय पक्ष, विविध संघटनांकडून गुलाबाचे फूल देऊन बांधवांचे स्वागतसकाळी साडेनऊला पहिली नमाज, तर दुसरी नमाज साडेदहा वाजता महापलिकडून पाण्याच्या टँकरची व्यवस्था पोलिसांचा चोक बंदोबस्त 

पुणे : रमजान ईदनिमित्त शहरातील अनेक भागात मुस्लिम बांधवानी गोळीबार मैदान व ईदगाह मशीद येथे नमाज पठण केले. याप्रसंगी राजकीय पक्ष, विविध संघटनांकडून गुलाबाचे फुल देऊन स्वागत करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.  

सकाळी साडेनऊ वाजता पहिली नमाज, तर दुसरी नमाज साडेदहा वाजता झाली. नवीन पोशाख परिधान करून लहान मुले, मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने आले होते. एकमेकांची गळेभेट घेत ईदच्या शुभेच्या देत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, काँग्रेस नेते मोहन जोशी, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, आमदार मेधा कुलकर्णी, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका सुजाता शेट्टी व विविध सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी भेट देऊन शुभेच्या दिल्या. 
काशेवाडी, भवानी पेठ, हरका नगर, राजेवाडी, लोहियानगर, मोमीन पुरा, गुलटेकडी, डायस प्लॉट, मोदी खाना, सॅलसबरी पार्क , भीमपुरा, चुडा मंताली, कॅम्प आणि कोंढवा परिसरातील सुमारे वीस हजार पेक्षा जास्त  मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी मैदानावर आले होते. 
महापलिकडून पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली होती. लष्कर विभागाकडून अग्निशमन गाडी, रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती. सामाजिक कार्यकर्ते इसाक जाफर मेमन गेल्या तीस वर्षांपासून स्वत:च्या खर्चातून स्टॉल उभा करत असून व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून कार्यक्रमाचे नियोजन करतात. पाणी व्यवस्था, दरी, स्वछता, याची ते १५ दिवसांपासून तयारी करत आहेत. समितीकडून सर्व धर्मातील नागरिक व राजकीय पक्ष, संघटनांना येथे बोलावले जाते व त्यांचा सत्कार देखील केला जातो. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गणेश जाधव, आरिफ मुंगळे, महाराष्ट्र प्रवक्ता प्रमोद संखद, विनोद कांबळे यांनी मुस्लिम बांधवाना गुलाबाच्या फुलांचे वाटप केले.  

...................पोलिसांचा चोक बंदोबस्त पोलीस विभागाकडून येणाऱ्या बांधवाची संख्या लक्ष्यात घेता चोख बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठ अधिकारी, विशेष शाखेचे पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी, साध्या वेशातील पोलीस आणि पोलीस शिरपाई असे एकूण ऐंशी पोलीस कर्मचारी तैनात केले होते, अशी माहिती लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी दिली.  ..................................

ईदगाह  येथे नमाज पठण केले तर तो पवित्र आणि नशीबवान ईद मिलनाची नमाज सुमारे गेल्या १२० वर्षांपासून गोळीबार मैदान आणि ईदगाह मशीदीत होते. रमजान ईद आणि बकरी ईद  फक्त दोन वेळाच वर्षातून येथे नमाज होते.

सर्व मुस्लिम बांधव येथे एकत्र येण्याची परंपरा जपतात. पाहुणे, मित्र यांच्या भेटीगाठी होतात, त्यामुळे आवर्जून येथे बांधव जमतात. हमाल, ड्रायव्हर, बाहेरच्या गावातील लोक येथे ईदला नमाज पठण करतात. शिरखुमाला येण्याचे आमंत्रण दिले जाते. ईदगाह येथे नमाजपठण केले तर ते पवित्र नशीबवान असल्याचे मानले जाते. येथे धमार्तील कोणत्या ही जातीभेद केला जात नाही. नमाज पडून झाले तरी येथे थांबून असतो. शुभेच्छा दिल्या जातात. समाधान वाटते, ईद साजरी केल्या सारखे वाटते. काही व्यक्ती वषार्तून दोन वेळाच नमाज पठण करतात त्यांना समाधान वाटते, अशी माहिती मौलाना शफी शेख यांनी माहिती दिली. 

टॅग्स :PuneपुणेRamzan Eidरमजान ईदMuslimमुस्लीम