शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

रामोशी समाज एसटी आरक्षणासाठी पुकारणार एल्गार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 20:27 IST

राज्यातील क्रांतिकारी बेरड, बेडर,रामोशी समाज हा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या मागास असून, या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश होण्यासाठी समाजातील विविध संघटनांनी आंदोलने व मोर्चा काढले.

ठळक मुद्देप्रमुख मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या माध्यमातून सप्टेंबरपासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन

बारामती : मराठा, धनगर समाजापाठोपाठ रामोशी समाज एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. समाजाच्या वतीने एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी रामोशी समाज गुरुवारी (दि. २३) एल्गार मोर्चा काढणार आहे. यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने कारभारी सर्कल, गुणवडी चौक, बसस्टँड, रिंग रोडमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत जय मल्हार क्रांती संघटनेचे ज्येष्ठ नेते बबन खोमणे यांनी माहिती दिली. बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत खोमणे बोलत होते. या वेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने देखील आरक्षणाबाबत भूमिका मांडण्यात आली.राज्यात रामोशी, बेरड, बेडर समाजाची लोकसंख्या ७० ते ८० लाख आहे. बेरड, बेडर रामोशी समाज हा क्रांतीकारी समाज आहे. आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध पहिले बंड केले. ब्रिटिशांना सळो की पळो करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक यांचेही स्वराज्याची स्थापना करण्यासाठी मोलाचे योगदान आहे.राज्यातील क्रांतिकारी बेरड, बेडर,रामोशी समाज हा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या मागास असून, या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश होण्यासाठी समाजातील विविध संघटनांनी आंदोलने केली, मोर्चा काढले. त्याचबरोबर शासनाच्या विविध पातळीवर निवेदने दिली. महाराष्ट्र स्तरावर रामोशी समाजाच्या आरक्षणाबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही, असे यावेळी सांगण्यात आले.कृती समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चातील प्रमुख मागणीही रामोशी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी होती. या मोर्चादरम्यान आम्हाला आश्वासन दिले होते. रामोशी समाजाच्या आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.परंतु, आजतागायत निर्णय झाला नाही. त्यामुळे जय मल्हार संघटनेच्या माध्यमातून १६ आॅगस्ट पासून संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू आहे.आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आमच्या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या माध्यमातून सप्टेंबरपासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.या वेळी जय मल्हार क्रांती सेनेचे ज्येष्ठ नेते बबनराव खोमणे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब मदने, संभाजी चव्हाण, मनोज पाटोळे, नाना जाधव, आबासो जाधव, सोमनाथ जाधव, सोमनाथ मदने, सागर खोमणे, गणेश जाधव, दादा चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :Baramatiबारामतीreservationआरक्षणGovernmentसरकार