रामनळागाव वैशिष्टपूर्ण कामगिरीमुळे देशभर परियचाचे : दोडल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:27 IST2020-12-13T04:27:39+5:302020-12-13T04:27:39+5:30

खेड तालुक्यातील आदर्श वनग्राम ''''रानमळा'''' गावाला औपचारिक भेट दिली. याप्रसंगी खेड तालुक्याचे भूमीपुत्र, पुणे विभाग वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, सामाजिक ...

Ramnalagaon is known all over the country for its unique performance: Dodal | रामनळागाव वैशिष्टपूर्ण कामगिरीमुळे देशभर परियचाचे : दोडल

रामनळागाव वैशिष्टपूर्ण कामगिरीमुळे देशभर परियचाचे : दोडल

खेड तालुक्यातील आदर्श वनग्राम ''''रानमळा'''' गावाला औपचारिक भेट दिली. याप्रसंगी खेड तालुक्याचे भूमीपुत्र, पुणे विभाग वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, सामाजिक वनीकरण विभाग वन अधिकारी किशोर पोळ, जुन्नर उपविभागीय सहाय्यक वनसंरक्षक संजय पाटील, खेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष शेंडगे,वन क्षेत्रपाल अशोक बुरसे यांच्यासह वनखात्याचे कर्मचारी उपस्थित होते.

दोडल म्हणाले की, रानमळा गाव व वनक्षेत्रातील लोकसहभागातून तन मन धन खर्ची घालून वृक्षसंवर्धनाचे प्रचंड काम उभे केले आहे. ही किमया रानमळा गावच्या मर्यादित न राहता राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात वृक्षसंवर्धन होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने निर्णय घेतला आहे .प्रथमत: रानमळा पॅटर्नचे प्रणेते यांनी प्रास्ताविकातून आजपर्यंतच्या यशस्वी उपक्रमाची माहिती दिली.

यावेळी पी. टी. शिंदे, सुजल दोडल, शिंदे, जि. रं. शिंदे, उल्हास भुजबळ, मोहन सुकाळे, मोहन शिंदे, माऊली भुजबळ, समीर शिंदे, निलेश शिंदे, जयश्री दौडकर, शंकुतला शिंदे, दशरथ शिंदे, गणेश भुजबळ, कैलास वाघोले, सतिश आणि नूतन भुजबळ आदी उपस्थित होते.

---

Web Title: Ramnalagaon is known all over the country for its unique performance: Dodal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.