शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Ramjan Eid : मुस्लिम बांधवांनो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद साधेपणाने साजरी करा; जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 18:52 IST

मुस्लिम बांधवांनो, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नवीन आदेश, जाणून घ्या काय आहेत...

पुणे: पुणे, पिंपरीसह ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी देखील पोलीस प्रशासनाकडून सुरु आहे. याच दरम्यान, उद्या मुस्लिम बांधवांची रमजान ईद साजरी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.तिचे पालन करणे मुस्लिमबांधवांना बंधनकारक असणार आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. 

दरवर्षी मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. एकत्रित येत नमाजपठण करून हे बांधव एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात.  मात्र, कोरोना संकटांमुळे सर्वच सण, उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे रमजान ईद सार्वजनिक रित्या साजरी न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यलयाकडून करण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरापासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होता.

* कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी ईदच्या दिवशी सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज पठण आणि इफ्तारसाठी मस्जिद अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये.   सर्व धार्मिक कार्यक्रम आपल्या घरातच साधेपणाने साजरे करावेत.* राज्यात संचारबंदी लागू असल्याने नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.* ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करू नये.* धार्मिक स्थळ बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी   करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी.* रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच मास्क सॅनिटायजरचा वापर करावा.

टॅग्स :PuneपुणेRamzan Eidरमजान ईदMuslimमुस्लीमcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी