ग्रामसेवक युनियन शिरूर अध्यक्षपदी रमेश जासूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:08 IST2021-06-20T04:08:13+5:302021-06-20T04:08:13+5:30

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शिरूर तालुक्याच्या नूतन कार्यकारिणींची निवड करण्यासाठी शिरूर येथे पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. यात शिरूर तालुका ...

Ramesh Jasud as Gramsevak Union Shirur President | ग्रामसेवक युनियन शिरूर अध्यक्षपदी रमेश जासूद

ग्रामसेवक युनियन शिरूर अध्यक्षपदी रमेश जासूद

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शिरूर तालुक्याच्या नूतन कार्यकारिणींची निवड करण्यासाठी शिरूर येथे पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. यात शिरूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली.

या वेळी अध्यक्ष- रमेश जासूद, उपाध्यक्ष - मंगल लगड, सचिव- सदानंद फडतरे, कोषाध्यक्ष संघटक - नंदकुमार वैद्य, सहसचिव- किशोर बनकर तर सदस्य म्हणून स्वाती सोनवणे, पोपट केदारी, विकास विशे, चेतनजी वाव्हळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोल घोळवे, बाळासाहेब गावडे, बगाटे यांनी काम पाहिले.

याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वाव्हाळ, जिल्हा ग्रामसेवक पतसंस्था चेअरमन राजेन्द्र सात्रस, माजी अध्यक्ष गंगाधर देशमुख, माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके, माजी सचिव संतोष डफळ, माजी सचिव गुलाब नवले, शांताराम पाडळे, सारिका दरेकर, सुरेखा साबळे, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन दादाभाऊ नाथ तर, विलास शिंदे यानी आभार मानले.

शिरूर तालुका ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी निवड झालेला नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करताना आमदार अशोक पवार.

Web Title: Ramesh Jasud as Gramsevak Union Shirur President