शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"मला आणि नरेंद्र मोदींना दिल्लीत पोहचवण्यासाठी पत्रकारांची मोठी मदत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 13:01 IST

आठवले म्हणाले, देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे सरकार बदलण्यात 'एक्सपर्ट'

पिंपरी :नरेंद्र मोदी यांना पत्रकारांनीही गुजरात येथून दिल्ली येथे पोहोचविले. पत्रकारांनी मोदींना मोठा सपोर्ट केला. मलाही दिल्ली माहीत नव्हती, मला दिल्लीपर्यंत पोहोचविण्यात पत्रकारांचा हात आहे, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी पिंपरी- चिंचवड येथील एका कार्यक्रमात सांगितले. 

आठवले म्हणाले, कायदा झाला तरी अत्याचार होतात. अजूनही दलितांवर अत्याचार होतात. त्यामुळे केवळ कायदे करून चालणार नाही. कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. कोरोना काळात शासनाने अनेक घटनांना मदत जाहीर केली. तशी पत्रकारांसाठी देखील मदत उपलब्ध होणे आवश्यक आहे. नरेंद्र मोदी हे लोकप्रिय पंतप्रधान आहेत. पत्रकारांनी त्यांना नेहमीच मदत केली आहे. त्यामुळे पत्रकारांच्या समस्या, अडचणी मोदींना माहिती आहेत. त्यामुळे मोदी हे पत्रकारांचे प्रश्न सोडवतील. त्यासाठी मी स्वतः यांना बोलणार आहे. 

देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे सरकार बदलण्यात 'एक्सपर्ट'

सध्याचे राज्य सरकार हे पडणार असल्याच्या अफवा पसरवली जात आहे. मात्र हे सरकार जाणार नाही, जाणार असते तर ते कशाला आले असते? हे सरकार यापुढेही २० वर्षे राहणार आहे. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे सरकार बदलण्यात एक्सपर्ट आहेत. सगळ्यांना सत्ता मिळत नाही. तशी मंत्रीपदीही सर्वांना संधी मिळत नाही. मात्र, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की, मंत्रीपदी संधी न मिळालेल्या आमदारांमध्ये नाराजी होऊन हे सरकार पडेल, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र सरकार पडणार नाही, असा ठाम विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

अमेरिकेतही आरपीआय पार्टी स्थापन करणार

अमेरिकेत रिपब्लिकन पक्ष आहे. तरीही अमेरिकेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आमच्या पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. नेपाळ येथे स्थापना केली आहे. तसेच जगभरातील देशांमध्ये पार्टी नेणार आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRamdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीJournalistपत्रकारAmericaअमेरिका