शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

राम जन्मला गं सखी राम जन्मला....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 3:01 PM

रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता राम, तसेच जय श्रीराम - जय श्रीराम अशा रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीत रामजन्म सोहळा उत्साहात पार पडला.... 

पुणे: रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता राम, तसेच जय श्रीराम - जय श्रीराम अशा रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीत रामजन्म सोहळा उत्साहात पार पडला. श्री रामजी संस्थानच्या वतीने तुळशीबाग येथील राममंदिरात रामजन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.३० पासूनच जन्मसोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी भक्तिमय कीर्तने सादर केली. कीर्तनातून रामनामाचा जप करण्यात आला. तसेच भक्ती, श्रद्धा, परंपरा यांची शिकवण देणारे कीर्तने सादर केली. हिंदू धर्म पाळणारे लोक शिस्त आणि नियमांचे नेहमी पालन करतात. असे त्यांनी नमूद केले. सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान रामाच्या पोशाखाची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १२.४० मिनिटांनी आफळे आणि रामजी संस्थानचे सदस्य यांच्या हस्ते जन्मसोहळा झाला. तुळशीबागेतील राम मंदिर आकर्षक झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले होते. संपूर्ण मंदिरात लाल, पिवळ्या, केशरी झेंडूच्या माळा लावण्यात आल्या होत्या. मंदिराचा गाभारा रंगबेरंगी पडद्यानी आणि फुलांनी सजवण्यात आला होता. संस्थानच्या सदस्यांनी पुणेरी पगडी, मराठमोळी शेरवानी आणि स्त्रियांनी नववारी साड्या असे पोशाख प्रदान केले होते. राम मंदिर तसेच बाहेरील भाग गदीर्ने तुडुंब झाला होता. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत रामजन्म सोहळ्यात अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते. कीर्तनकार आफळे यांच्या बरोबर सर्व रामभक्त भक्तिरसात तल्लीन झाले होते. सोहळ्यात रामाचा धागा भाविकांना देण्यात आला. .....................रामजन्म सोहळ्यासाठी पाळणा फुलांच्या माळांनी सजवण्यात आला होता. जन्माच्या वेळी पाळण्याला बांधलेली दोरी हलवून जन्म सोहळा करण्यात आला. सोहळ्यानंतर सुंठवडा आणि कलिंगडाच्या फोडी असे भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. मंदिराच्या सदस्यांच्या मदतीने आणि पोलिसांच्या सहकायार्ने सोहळा उत्साहात पार पडला.

टॅग्स :PuneपुणेRam Navamiराम नवमीtulsibaugतुळशीबागCharudatta Aafleचारुदत्त आफळे