शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राम आमचाही, पण त्याचे राजकारण करणे अयोग्य; रमेश चेन्नीथलांची भाजपवर टीका

By राजू इनामदार | Updated: January 23, 2024 16:57 IST

राम आमचाही आहे, मात्र राम मंदिर व राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे राजकारण करणे अयोग्य आहे असे ते म्हणाले....

पुणे :काँग्रेसकडे महात्मा गांधी यांची सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची विचारधारा आहे, ज्यांच्याकडे कसली विचारधारा नाही असे लोक मथूरा आणि काशी असेच बोलणार अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली. राम आमचाही आहे, मात्र राम मंदिर व राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे राजकारण करणे अयोग्य आहे असे ते म्हणाले.

पक्षाच्या लोकसभा निवडणूकपूर्व विभागीय बैठकीसाठी चेन्नीथला मंगळवारी पुण्यात आले होते. बैठकीपूर्वी त्यांनी काँग्रेसभवनमध्ये पत्रकारांबरोबर संवाद साधला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच सोनल पटेल व काँग्रेसचे अन्य राज्य पदाधिकारी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यावेळी उपस्थित होते. चेन्नीथला यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, सोमवारी राम मंदिर उदघाटनाच्या कार्यक्रमाचे राजकीय भांडवल केले गेले जे अतीशय चुकीचे होते. त्यांच्याकडे कोणताही विचार नाही, नेते नाहीत. त्यामुळेच ते विकासाच्या मुद्द्यावर, बेरोजगारीच्या मुद्द्यावर राजकारण करू शकत नाहीत. त्यातूनच ते अयोध्येनंतर आता काशी, मधूरा असेच बोलत राहणार. काँग्रेसला सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जायचे असते. तशा प्रकारच्या राजकारणावरच आम्ही काम करत आलो आहोत.काँग्रेसचे अनेक नेते भाजपची वाट धरत आहेत याकडे लक्ष वेधल्यानंतर चेन्नीथला म्हणाले, जे पदाच्या मागे धावतात तेच असा बदल करतात. भाजपकडे नेतेही नाहीत, त्यामुळे ते कधी इडीची धमकी देऊन तर कधी पदांची लालूच दाखवून अन्य पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेतात. कोणी असे जात असेल तर त्याचे आम्हाला काही वाटत नाही, याचे कारण असे लोक कुठेही जात असतात.

काँग्रेस आता देशातील भाजप विरोधकांमध्ये ऐक्य करण्याच्या प्रयत्नात आहे. तो एकोपा आम्हाला वाढवायचा आहे. इंडिया आघाडीत अनेक पक्ष आहेत, जागा वाटप आम्ही एकमेकांना समजून घेऊन करू, प्रकाश आंबेडकर आमच्या बरोबर यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते येतील. अजूनही बरेच जाण आहेत. इंडिया आघाडी भक्कम होईल असा दावा चेन्नीथला यांनी केला.

राहूल गांधी यांची भारत न्याय यात्रा उधळून लावण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप चेन्नीथला यांनी केला. यात्रेत अडथळा निर्माण केला जात आहे. पोलिसांची परवानगी नाकारणे, प्रवेश बंदी करणे यासारखे प्रकार केले जात आहेत. राहूल गांधी यांची ही यात्रा न्याय मागण्यासाठीची यात्रा आहे, नागरिकांचा यात्रेला मिळणारा प्रतिसादच त्यांना त्रासदायक होतो आहे असे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे