शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

राम गणेश गडकरींच्या तोडलेल्या स्मारकाची पूजा करून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 11:04 IST

भाषाप्रभू राम गणेश गडकरींचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय परशुराम अशा घोषणा देत अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या सदस्यांनी राम गणेश गडकरी यांच्या तोडलेल्या स्मारकाची पूजा करून जाहीर निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देअखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या सदस्यांनी राम गणेश गडकरी यांच्या तोडलेल्या स्मारकाची पूजा करून जाहीर निषेध व्यक्त केला. तीन वर्षांपूर्वी संभाजी उद्यानातील पुतळा नराधमांनी तोडला होता. पुणे शहरातील कुठल्याही परिसरात हा पुतळा बसवून दयावा अशी मागणी महासंघाने केली.

पुणे - भाषाप्रभू राम गणेश गडकरींचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय परशुराम अशा घोषणा देत अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या सदस्यांनी राम गणेश गडकरी यांच्या तोडलेल्या स्मारकाची पूजा करून जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे, पुणे जिल्हा अध्यक्ष विजय शेखदार, पुणे शहर अध्यक्ष मयुरेश आरगडे, चिन्मय पाठक, तेजस पाठक, सोमनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

तीन वर्षांपूर्वी संभाजी उद्यानातील पुतळा नराधमांनी तोडला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा दिवसाच्या आत पुतळा बसवून देतो असे आश्वासन दिले. परंतु गेली तीन वर्षे झाली हा पुतळा बसवण्यात आला नाही. पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे आम्ही गडकरी यांचा नवीन पुतळा देण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांनी हा पुतळा घेतला नाही. पालिका स्वखर्चाने पुतळा उभारेल असे आम्हाला सांगण्यात आले. महानगरपालिकेने पुतळा बसवण्यासाठी पुढाकार घेतला नाही. महासंघ आक्रमक भूमिका घेऊन स्वखर्चाने पुतळा उभारणार आहे. पुणे शहरातील कुठल्याही परिसरात हा पुतळा बसवून दयावा अशी मागणी महासंघाने केली.

आता स्मारकाची अवस्था बघितली तरी अजून काम चालू आहे. महानगरपालिका फक्त आश्वासन देते. हे स्मारक होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. दर दोन महिन्यांनी आम्ही दादोजी कोंडदेव, गडकरी यांच्या पुतळ्याची आठवण करून देत होतो. महानगरपालिकेकडून असे सांगण्यात आले की सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये याची आम्ही काळजी घेत आहोत. 

- आनंद दवे - प्रवक्ते, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

टॅग्स :Puneपुणे