विकास आराखड्यातील रस्त्यावरून महापालिकेवर मोर्चा
By Admin | Updated: March 4, 2015 00:35 IST2015-03-04T00:35:01+5:302015-03-04T00:35:01+5:30
संरक्षण विभागाच्या जागेवर असलेल्या बर्माशेल (इंदिरानगर) येथील झोपडपटट्ीच्या मध्यभागातून १०० फुटांचा रस्ता दर्शविण्यात आला आहे.

विकास आराखड्यातील रस्त्यावरून महापालिकेवर मोर्चा
पुणे : संरक्षण विभागाच्या जागेवर असलेल्या बर्माशेल (इंदिरानगर) येथील झोपडपटट्ीच्या मध्यभागातून १०० फुटांचा रस्ता दर्शविण्यात आला आहे. यापूर्वी झोपडपटट्ीच्या समोरच्या भागातून हा रस्ता मंजूर करण्यात आला होता, त्याप्रमाणे कार्यवाही करून अनेकांना बेघर होण्यापासून वाचवावे,या मागणीसाठी शनिवारवाड्यापासून महापालिकेवर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
मुख्य सभेपुढे विकास आराखडा मंजुरीसाठी आला असल्याने त्यामध्ये योग्य ते बदल करून तेथील लोकांना बेघर होण्यापासून वाचवावे, या मागणीकरिता शिवसेनेचे शहर संघटक सुनील टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.