पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. ही मिरवणूक शनिवार, दिनांक २ डिसेंबर रोेजी काढण्यात आली. मिरवणुकीचे उद्घाटन सकाळी ८.३० वाजता संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते झाले. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी मिरवणूकीचे नेतृत्व केले.मिरवणूक आझम कॅम्पस गेट नं. १ येथून निघून, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, ट्राय लक हॉटेल, गाय कसाब मशीद, बाबाजान दर्गा, सरबतवाला चौक, हुसैनीबाग, क्वार्टर गेट, मॉडर्न बेकरी, इस्लमपुरा, ए. डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा, पद्मजी पोलीस चौकी, निशांत थिएटर, भगवानदास चाळ, चुडामण तालीम, पूना कॉलेज आणि आझम कॅम्पस गेट नं. २ येथे सांगता झाली.एम. सी. ई. सोसायटीच्या सर्व संस्थातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मिरवणूकीत सहभागी झाले. अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १७वे वर्ष आहे.
हजरत मोहम्मद पैगंबर जयंंतीनिमित्त पुण्यातील एमसीई सोसायटीतर्फे अभिवादन मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 13:26 IST
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते.
हजरत मोहम्मद पैगंबर जयंंतीनिमित्त पुण्यातील एमसीई सोसायटीतर्फे अभिवादन मिरवणूक
ठळक मुद्देसंस्थेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांच्या हस्ते झाले सकाळी ८.३० वाजता मिरवणुकीचे उद्घाटन अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १७वे वर्ष