शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

किस्सा निवडणुकीचा! कसबा मतदार संघातून रॅली; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बापट थेट बॉनेटवर

By राजू इनामदार | Updated: November 5, 2024 15:21 IST

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाय दुखायला लागल्याने बापट मांडी वगैरे घालून बॉनेटवर अगदी व्यवस्थित बसले

पुणे : निवडणूक म्हणजे नुसती धामधुम. पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याबरोबरच ती उमेदवारालाही दमवणारी असते. कोणाला भेटायचे, कोणाला नाही याची वेगळी गणिते असतात. त्याशिवाय रोजच्या प्रचारफेऱ्या, बैठका, काही वर्गांच्या एकत्रित भेटीगाठी असे बरेच काही असते. त्यात उमेदवार पार अर्धानिम्मा होऊन जातो. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, गिरीश बापट हे उमेदवार चालण्यासाठी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे कार्यकर्ते दमून जात, पण हे मात्र सकाळी जितक्या उत्साहात असत, तसेच किंबहूना त्यापेक्षाही जास्त उत्साहात संध्याकाळच्या प्रचारफेरीत सहभागी होत. त्यांचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, निकटचे स्नेही अजूनही त्यांचे अनेक किस्से सांगत असतात.

गिरीश बापट यांच्याबद्दलचा एका निवडणुकीतील असाच एक किस्सा. कसबा विधानसभा मतदारसंघ हा बापट यांचा हक्काचा मतदारसंघ. अगदी सुरूवातीला ते एकदा इथून पराभूत झाले. त्यानंतर सलग ५ वेळा ते या मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले. खासदार झाल्यावरच त्यांचा हा मतदारसंघ सुटला. बापट यांच्या प्रचारात बऱ्याच गमतीजमती होत असतं. स्वत: बापट मिश्किल स्वभावाचे होते. एका प्रचार फेरीत मतदारसंघातून त्यांची रॅली निघाली. जाहीर प्रचाराचा अखेरचा दिवस. इतक्या दिवसांच्या प्रचाराने त्यांच्यावर चांगलाच ताण आला होता. पण तरीही ते फिरत होते. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत होते.अशाच एका गल्लीत त्यांचे पाय भलतेच दुखायला लागले. त्यांना अगदीच चालवेना. काय करायचे याचा विचार करत असतानाच मागे एक कार्यकर्ता चारचाकी गाडी चालवतच अभिवादन रॅलीत असलेला त्यांना दिसला. त्यांनी लगेचच त्याला पुढे बोलवले. बापटसाहेब बोलावतात म्हटल्यावर तोही लगेचच पुढे आला. गर्दी बाजूला झाली. गाडी बरोबर बापट यांच्यासमोर आली. बापट यांनी लगेचच गाडीच्या बॉनेटवर बैठक मारली. मांडी वगैरे घालून ते एका कडेला अगदी व्यवस्थित बसले.

तसे बसून त्यांनी रॅली सुरू करायला सांगितले. पुढचा सगळा परिसर त्यांनी असेच बॉनेटवर बसून मतदारांना अभिवादन केले. गाडीच्या बॉनेटवर बसलेले बापट, मागे झेंडे घेतलेले कार्यकर्ते, अशी ही मिरवणूक नंतर सगळ्या मतदारसंघात चर्चेचा विषय झाली होती. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kasba-peth-acकसबा पेठgirish bapatगिरीश बापटBJPभाजपा