शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

राखीपोर्णिमेचे आयाम बदलाहेत! नवा दृष्टीकोन : रक्षा बहिणी-बहिणींची..स्वत:चीही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 21:29 IST

कोणताही सण ही पुरुषाची मक्तेदारी राहिलेली नाही...

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : भावाने बहिणीचे रक्षण करावे, तिला जपावे या भावनेतून भारतीय संस्कृतीमध्ये राखीपोर्णिमेचा सण साजरा केला जातो. कालानुरुप सणांमागील संकल्पना बदलत आहेत. बदलत्या काळात स्त्री सक्षम झाली, स्वत:चे रक्षण करण्याची ताकद तिच्यात निर्माण झाली. त्यामुळेच आता राखीपोर्णिमा अनोख्या पध्दतीने साजरी केली जात आहे. बहिणीने बहिणीला राखी बांधण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जोर धरु लागला आहे. अनेक शाळांमध्येही मुलांमध्ये हा नवा दृष्टीकोन विकसित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.राखीचा धागा हा भाऊ-बहिणीच्या स्नेहबंधाचे प्रतीक मानला जातो. पूर्वीच्या काळी स्त्रियांवर अनेक सामाजिक बंधने होती. राखीपोर्णिमेच्या निमित्ताने भाऊ बहिणीच्या घरी जायचा. त्याच्याशी मनमोकळया गप्पा मारत तिला माहेरची ख्यालीखुशाली कळायची. हळूहळू समाजाची मानसिकता बदलली, स्त्री घराबाहेर पडू लागली. आकांक्षेच्या पंखांवर स्वार होत तिने गरुडझेप घेतली आणि कर्तृत्व सिध्द केले. सणांच्या पारंपरिक महत्वाची चिकित्सा होऊ लागली. सण-समारंभांना आधुनिक आयाम मिळू लागले. यातूनच नवा दृष्टीकोन विकसित होत गेला.अनेक कुटुंबांमध्ये मुलींचे मुलाप्रमाणे संगोपन करत समानतेचा धडा गिरवला जातो. कोणताही सण ही पुरुषाची मक्तेदारी राहिलेली नाही. त्याचप्रमाणे राखीपोर्णिमेलाही केवळ बहिणीने भावाला राखी बांधावी, हा पूर्वापार चालत आलेला समज मोडीत निघाला आहे. आम्ही चार बहिणी; भाऊ नाही याचे कधीही दु:ख वाटले नाही. आम्ही बहिणी लहानपणापासून एकमेकींना राखी बांधत राखीपोर्णिमेचा सण साजरा करतो, अशी भावना अमृता देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.-------------कोणत्याही बदलाची सुरुवात ही घरापासून होत असते. बदलत्या आयामांचे संस्कार शाळेतूनही होत असतात. माझा मुलगा पहिलीत आहे. परवाच त्यांच्या शाळेत राखी बनवण्याचे प्रात्यक्षिक पार पाडले. तेव्हाच राखीपोर्णिमेला भाऊ-भाऊ एकमेकांना किंवा बहिणी एकमेकींना राखी बांधू शकतात, असे शिक्षकांनी सांगितल्याचे त्याने घरी येऊन सांगितले. शाळेने दिलेली ही नवी शिकवण मुलांच्या घडवण्याच्या दृष्टीने मला अत्यंत कौतुकास्पद वाटते.- सानिका जोशी, पालक--------------राखीपोर्णिमेचा असाही आयाम!अनेक घरांमध्ये मुलगी वडिलांना, भाऊ बहिणीला आणि आईला राखी बांधण्याची पध्दत प्रचलित आहे. कोणतेही नाते दृढ होणे सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक बनले आहे. त्यामुळे राखीपोर्णिमेच्या निमित्ताने हे बंध घट्ट करण्यावर भर दिला जात आहे.---------स्वत:लाच राखी बांधते!राखी म्हणजे सुरक्षिततेचा बंध असे म्हटले जाते. मी लहानपणापासून भावाला राखी बांधते. मोठी झाल्यावर मी शिक्षण, नोकरीनिमित्त एकटी घराबाहेर पडू लागले. बाहेर वावरत असताना स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावरच असते. मग राखीचा मान मीच मला का देऊ नये? हा विचार मनात आला. त्यामुळे गेल्या सहा-सात वर्षांपासून मी स्वत:लाच राखी बांधते.- पूजा मनीष 

टॅग्स :PuneपुणेRaksha Bandhanरक्षाबंधन