शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ - बहिणींचे नातं जोपासणारा सण! मुक्ताईने पाठवली माऊलींना राखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 13:32 IST

मुक्ताई व ज्ञानोबा यांच्यातील भाऊ - बहिणींचे नातं जोपासणारा सण भाविकांना प्रत्यक्ष अनुभवला

आळंदी: रक्षाबंधन म्हणजे बहिण - भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग म्हणून ओळखला जातो. यापार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईबाई संस्थांनच्या वतीने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना दरवर्षी राखी पाठवण्याची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव व सोपानदेव या तिन्ही देवरुपी संत भावंडांना रक्षाबंधन निमित्त राखी अर्पण करण्यात येते. यंदाही आदिशक्ती संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर येथून माऊलींना राखी आली आहे.                 तीर्थक्षेत्र आळंदीत गुरुवारी (दि.११) पहाटे माऊलींच्या संजीवन समाधीला श्री मुक्ताई देवस्थानचे  विश्वस्त संदीप रविंद्र पाटील व अंकीता संदीप पाटील यांच्या हस्ते पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा संपन्न करण्यात आली. त्यानंतर माऊलींच्या समाधीवर राखी अर्पण करण्यात आली. श्री संत ज्ञानेश्वर माऊलीं तर्फे मुक्ताबाईला साडी चोळी भेट म्हणून देण्यात आली. यावेळी विशाल महाराज खोले, दिपक महाराज, सागर महाराज, गणेश महाराज, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान दर्शनबारीतून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. मुक्ताई व ज्ञानोबा यांच्यातील भाऊ - बहिणींचे नातं जोपासणारा सण भाविकांना प्रत्यक्ष अनुभवला. मंदिर देवस्थानने सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हा क्षण पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनAlandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरSocialसामाजिक