शहरं
Join us  
Trending Stories
1
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
2
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
4
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
5
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
6
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
7
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
8
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
9
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
10
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
11
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
13
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
14
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
15
"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा
16
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
17
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
19
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
20
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
Daily Top 2Weekly Top 5

राकेश रोशन यांची जमीन वादग्रस्त

By admin | Updated: May 31, 2017 02:31 IST

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक राकेश रोशन यांची खंडाळा राजमाची गार्डनसमोरील सुंदरभवन हॉलिडे होमची जागा वादाच्या भोवऱ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : ज्येष्ठ चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक राकेश रोशन यांची खंडाळा राजमाची गार्डनसमोरील सुंदरभवन हॉलिडे होमची जागा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महसूल विभागाच्या अधिका-यांनी जागेचा पंचनामा करण्यास सुरुवात केली असून, बेकायदा उत्खननही थांबविण्यात आलेआहे.लोणावळा नगर परिषदेकडून जागेचा ले आऊट मंजूर करताना सरकारी जागा व कब्रस्तानच्या जागेपैकी काही भाग हडप केल्याच्या आरोपांवरून मावळच्या महसूल विभागाने जागेचा सोमवारी पंचनामा केला. गौण खनिज उत्खननाची परवानगी न घेता सरकारी पड जागेत उत्खनन केल्याप्रकरणी कारवाई करत काम बंद करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचे लोणावळ्याचे मंडल अधिकारी बजीरंग मेकाले यांनी सांगितले. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या राजमाची गार्डन खंडाळा समोरील भूखंड दिग्दर्शक राकेश रोशन व अभिनेते हृतिक रोशन यांनी सुंदर भवन हॉलिडे होम नावाने खरेदी केला आहे. तेथे नगर परिषदेमधून बांधकामाचा ले आऊट मंजूर करत संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. ले आऊट मंजूर करताना या भूखंडाच्या पोटभागात असलेला सर्व्हे नं. १८/१ अ ही सरकारी पड आकार ही ५१० चौरस मीटर जागा व सर्व्हे नं. १८/२ या कब्रस्थानच्या ७०४ मीटर जागेपैकी काही जागा हडप करण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. किरण गायकवाड यांनी केला आहे. या बाबतची कागदपत्रे त्यांनी माहिती अधिकारात मिळविली आहेत. १९५३ सालापासून सातबारा उतारा व त्यानंतर सिटी सर्व्हेवर वरील दोन्ही जागा असताना सन २०१७ मध्ये त्या अचानक गायब कशा होऊ शकतात. ही सरकारी जागेची लूट असल्याने उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीकडे गायकवाड यांनी दाद मागितली आहे. सोमवारी मावळ महसूलचे अधिकारी व लोणावळा मंडल अधिकारी यांना सुंदर भवनच्या जागेचा पंचनामा केला. अवैध उत्खननाच्या कामाला पायबंद घातला. लोकमतने दि. २७ मे रोजीच्या अंकात ‘ले आऊट मधून सरकारी जागा गायब’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल शासकीय यंत्रणांनी घेत तातडीने कारवाई केली. लोणावळा नगर परिषदेनेही काम बंद करण्याची नोटीस बजावली असून, कामाचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.