देलवडीच्या उपसरपंचपदी राजश्री शेलार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:11 IST2021-09-11T04:11:44+5:302021-09-11T04:11:44+5:30
ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक पातळीवर इतरांना संधी मिळावी म्हणून माजी उपसरपंच मंगल राजाराम शेलार यांनी राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक ...

देलवडीच्या उपसरपंचपदी राजश्री शेलार बिनविरोध
ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक पातळीवर इतरांना संधी मिळावी म्हणून माजी उपसरपंच मंगल राजाराम शेलार यांनी राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेत शेलार यांचे विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांना बिनविरोध घोषित करण्यात आले. त्यानंतर ग्रामदैवत खंडोबा मंदिर यांचे मुखदर्शन घेण्यात आले. या वेळी सरपंच नीलम काटे, बाजार समितीचे सभापती शिवाजी वाघोले, भीमा पाटसचे संचालक विकास शेलार, बबन रणवरे, तुकाराम वांझरे, महेश शेलार, नरेंद्र काटे, बंडू शेलार, जनार्दन लव्हटे, बापूराव शेलार, अर्जुन वाघोले, अनिल वांझरे, राजाराम शेलार, दीपक देसाई, नीलेश भालेराव, संजय पडळकर, महादेव शेलार, लक्ष्मण शेलार, विलास शेलार, शरद शेलार, दत्तात्रेय शेलार नितीन कोंडे, शिवाजी वांझरे, बाळासाहेब चांदगुडे, भाऊसाहेब शेलार, सचिन शेलार, महेश रणवरे ,भूषण जगताप, नवनाथ थोरात, सोनबा टुले आदी मान्यवर उपस्थित होते.
१० केडगाव शेलार