राजीव गांधी संस्कारी नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:13 IST2021-08-21T04:13:55+5:302021-08-21T04:13:55+5:30

पुणे : राजीव गांधी यांच्या सुसंस्कृतपणाची दाद खुद्द अटलबिहारी वाजपेयी यांनी दिली होती. अशा संस्कारी नेत्यांची उणीव सध्याच्या राजकारणात ...

Rajiv Gandhi is a cultural leader | राजीव गांधी संस्कारी नेते

राजीव गांधी संस्कारी नेते

पुणे : राजीव गांधी यांच्या सुसंस्कृतपणाची दाद खुद्द अटलबिहारी वाजपेयी यांनी दिली होती. अशा संस्कारी नेत्यांची उणीव सध्याच्या राजकारणात जाणवते आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

पटोले यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी कात्रजमधील राजीव गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष गोपाळ तिवारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजीवजींच्या क्रीडाविषयक धोरणांमुळेच आदिवासी भागातील लिंबारामला सुवर्णपदक मिळू शकले, त्याचे नाव क्रीडा पुरस्कारातून वगळणे हे भाजपाच्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन असल्याची टीका तिवारी यांनी केली. आमदार शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, गटनेते आबा बागुल, कमल व्यवहारे, सोनाली मारणे, श्रीरंग चव्हाण, आबा जगताप, अवधूत मते, अर्चना शहा आदी या वेळी उपस्थित होते.

Web Title: Rajiv Gandhi is a cultural leader