राजगुरुनगरमध्ये पुन्हा भरदिवसा घरफोडी
By Admin | Updated: November 17, 2014 05:18 IST2014-11-17T05:18:50+5:302014-11-17T05:18:50+5:30
सकाळी ११.३० ते १२.४५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटा दरवाजाची लोखंडी कडी-कोयंडे तोडून घुसला.

राजगुरुनगरमध्ये पुन्हा भरदिवसा घरफोडी
राजगुरुनगर : राजगुरुनगरमध्ये दिवसा घरफोडी होण्याचे प्रकार सुरूच आहेत. घरात कोणी नसताना पाळत ठेवून दरवाजाचा कडीकोयंडा कापून ४९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी वाफगाव रस्त्यावर घडली.
राजगुरुनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद मारुती नाईकरे (रा. नीतेश अपार्टमेंट, वाफगाव रस्ता, राजगुरुनगर) यांच्या घरात १२ तारखेला सकाळी ११.३० ते १२.४५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटा दरवाजाची लोखंडी कडी-कोयंडे तोडून घुसला. त्याने सोन्याची साखळी, सोन्याचे मणी, कानातील फुले, अंगठी असे ४९ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. चोरी झाल्याच्या सुमारास आनंद नाईकरे हे खेड तहसीलदार कार्यालयात कामासाठी गेले होते. ते घरी आल्यानंतर दरवाजाचा कडीकोयंडा तोडल्याचे निदर्शनास आले. (वार्ताहर)