राजेश जाधव खूनप्रकरणी आणखी ५ जणांना अटक

By Admin | Updated: November 4, 2014 04:07 IST2014-11-04T04:07:06+5:302014-11-04T04:07:06+5:30

पाच दिवसांपूर्वी पिंपरीतील डीलक्स चौकात झालेल्या राजेश राजू जाधव (वय ३०, रा. पिंपरी) यांच्या खूनप्रकरणातील आणखी पाच आरोपींना पकडण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे.

Rajesh Jadhav murder case: 5 more arrested | राजेश जाधव खूनप्रकरणी आणखी ५ जणांना अटक

राजेश जाधव खूनप्रकरणी आणखी ५ जणांना अटक

पिंपरी : पाच दिवसांपूर्वी पिंपरीतील डीलक्स चौकात झालेल्या राजेश राजू जाधव (वय ३०, रा. पिंपरी) यांच्या खूनप्रकरणातील आणखी पाच आरोपींना पकडण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे.
निखिल राजू सरोदे (वय २१, रा. इंदिरानगर, पिंपरी), महेश महादेव चंदनशिवे (वय १९, रा. अशोकनगर, पिंपरी), अजय ऊर्फ जिमी उदय सिंग (वय २०, रा. इंदिरानगर, पिंपरी), अरुण दिलीप कांबळे (वय २२, रा. रोहिदास हौसिंग सोसायटी, सुभाषनगर, पिंपरी), सलीम पापा शेख (वय २९, रा. पेट्रोल पंपासमोर, पिंपळे सौदागर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपरी डीलक्स चौकातील नगर भूमापन कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत राजेश राजू जाधव या तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. खुनानंतर सातही आरोपी पसार झाले. दरम्यान, शनिवारी राहुल गौतम जाधव व आकाश श्रीधर मगर या दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. तसेच या खूनप्रकरणात फरार असलेल्या इतर पाच आरोपींना रविवारी अटक करण्यात आली.(प्रतिनिधी)

Web Title: Rajesh Jadhav murder case: 5 more arrested