राज ठाकरेंनी देशाची किंमत फक्त पाच कोटी केली काय ?- अजित पवार

By Admin | Updated: October 24, 2016 23:50 IST2016-10-24T18:40:17+5:302016-10-24T23:50:00+5:30

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ठाकरे बंधूंवर टीकेची झोड उठवली आहे.

Raj Thackeray, what is the price of the country just five crore? - Ajit Pawar | राज ठाकरेंनी देशाची किंमत फक्त पाच कोटी केली काय ?- अजित पवार

राज ठाकरेंनी देशाची किंमत फक्त पाच कोटी केली काय ?- अजित पवार

ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 24 - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ठाकरे बंधूंवर टीकेची झोड उठवली आहे. राज ठाकरेंनी देशाची किंमत फक्त पाच कोटी केली का ?, असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच पेंग्विनच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं आहे.

राणीच्या बागेत पेंग्विनचा मृत्यू झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नवीन पेंग्विन आणण्याचं जाहीर केलं आहे. त्याच मुद्द्यावरून अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे. राणीच्या बागेत पेंग्विन आणणं हा बालहट्ट आहे. आधी रस्त्यावरील खड्डे बुजवा आणि नंतर पेंग्विन आणा, असा उपरोधिक सल्ला अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

अजित पवारांनी दोन्ही ठाकरे बंधूंवर सडकून टीका केल्यानं राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अजित पवारांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.

Web Title: Raj Thackeray, what is the price of the country just five crore? - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.