शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"वयाने मोठा असणारा बाप असतो हे राज ठाकरेंनी लक्षात घ्यावे", पुण्यातून संभाजी ब्रिगेडचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 14:22 IST

वादग्रस्त भाषे प्रकरणी राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे संभाजी

पुणे : राज ठाकरे यांना वादग्रस्त भाषण करून जर महाराष्ट्र पेटवण्याची भाषा होत असेल, महाविकास आघाडी सरकार व गृहमंत्री डोळे बंद करून राज्यातील तमाशा पाहणार असतील तर हे राज्याचे दुर्दैव आहे. यामुळे जर महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण घडूळ झाले. तर राज्य सरकार राज ठाकरे यांना अटक करणार का...? सवाल पुण्यातून संभाजी ब्रिगेडने  उपस्थित केला आहे. तर वादग्रस्त भाषे प्रकरणी राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशी मागणीसुद्धा त्यांनी केली आहे.

संभाजी ब्रिजेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले, राज ठाकरेंच्या गाडीत पेट्रोल/डिझेल कोण भरतं, त्यांच्या घरातला गॅस सिलेंडर कुण्याच्या पैशानी पुरवला जातो. त्यांच्या कार्यकर्त्यांची घरं कशी चालतात...? महागाई एवढी वाढलेली असताना मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरातील चुली कोण पेटवतो...? कारण सध्याची भयंकर महागाई पाहता, राज ठाकरे महागाईवर बोलायला तयार नाही. नरेंद्र मोदी व भाजपची ते किती दलाली करत आहेत म्हणून गप्प आहेत. खोटा इतिहासाचा संदर्भ देऊन ते महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. राज ठाकरेंना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. 

वयाने मोठा असणारा बाप असतो

संभाजी ब्रिगेडचा जन्म 1995 चा आहे. त्यानंतर चार वर्षांनी राष्ट्रवादी जन्माला आली आणि 2006 ला मनसे बाळूत्यात होती. याचा अर्थ वयाने मोठा असणारा बाप असतो, हे राज ठाकरे यांनी लक्षात घ्यावे. जो व्यक्ती स्वतःच्या आजोबाचा होऊ शकत नाही तो व्यक्ती महाराष्ट्राचा काय होणार. फक्त 'टोलधाड' टाकून पैसे कमावणार यापेक्षा नवीन काही नाही. इतिहासाचं ब्राह्मणीकरण करून खोटा इतिहास सांगणाऱ्या माणसाची किती लाचारी करायची हे लक्षात आले. खरंतर यांचा वैचारिक डीएनए तपासणे गरजेचे आहे.

आमच्या नादी लागू नका

राज ठाकरे पेट्रोल/डिझेल, गॅस, इंधन दरवाढ दिसत नाही. मात्र पुरंदरेची चमचेगिरी दिसते. संभाजी ब्रिगेड प्रबोधनकार ठाकरे यांचा वैचारिक वारसा जपते. त्यांच्या विचारांनी काम करते. संभाजी ब्रिगेड हे आग्या मोहोळ आहे, आमच्या नादी लागू नका असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. 

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडRaj Thackerayराज ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtraमहाराष्ट्रBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरे