शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Raj Thackeray: मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रा बेकायदेशीर नाही, नामवंत वकिलाने दिला दाखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 14:05 IST

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचे औचित्य साधून मनसे अनावरण केलेल्या नव्या झेंड्यानंतर राजकीय विश्वात जोरदार चर्चा रंगू लागली.

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत लाखो लोकांसमोर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदींवरी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. राज यांची ही सभा घोषणेपासूनच चर्चेत आहे. तर, औरंगाबादच्या सभेत मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा ऐवजी रेल्वे इंजिन घेण्यात आलं आहे. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज यांनी राजमुद्रा ऐवजी इंजिन का घेतलं? असा प्रश्नही सर्वांना पडला आहे. तर, राजमुद्रा वापरणं कायदेशीर कि बेकायदेशीर असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. आता, पुण्यातील नामवंत विधिज्ञ असीम सरोदे यांनी राजमुद्राच्या वापराबद्दल कायदेशीर माहिती दिली आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचे औचित्य साधून मनसे अनावरण केलेल्या नव्या झेंड्यानंतर राजकीय विश्वात जोरदार चर्चा रंगू लागली. या झेंड्यावरून काही जण शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरल्यामुळे राज ठाकरें आणि मनसेवर टीका करताना दिसून आले. तर काहीजण झेंड्यावर राजमुद्रा वापरण्यास काहीच हरकत नसल्याचं मत व्यक्त करत आहेत. राजमुद्राच्या वापरावरुन हा वाद असतानाच, औरंगाबादच्या सभेत मनसेच्या झेंड्यावर पुन्हा इंजिन दिसून आले. त्यामुळे, झेंड्यावर राजमुद्रा वापरण्याची चर्चा पुन्हा होताना दिसत आहे. याबाबत, राजमुद्रा वापरणं हे बेकायदेशीर नसल्याचं मत अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे.  

मनसेच्या झेंड्यावरील 'राजमुद्रा' बेकायदेशीर नाही.छत्रपतींची राजमुद्रा स्वाभिमानी इतिहासाची निशाणी आहे. त्या राजमुद्रेचे कुणी कॉपीराइट घेतलेले नाही व घेऊसुद्धा शकत नाहीत. भारत स्वतंत्र झाला तेव्हाच संविधानाने सगळे जुने पद,पदव्या, टायटल्स (जुने चिन्ह, निशाण्या) रद्द केले आहेत. राज ठाकरे यांच्या मनसे च्या झेंड्यावर असलेली 'राजमुद्रा' काढून टाका असे सांगण्याचा कुणालाच अधिकार नाही. मनसे च्या झेंड्यावर तेव्हाची ' राजमुद्रा' असणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरत नाही, मनसेच्या झेंड्यावर 'राजमुद्रा' असणे बेकायदेशीर सुद्धा ठरत नाही.

झेंड्यावर पुन्हा इंजिन येण्याचं 'राज'कारणं

राज ठाकरे यांनी झेंड्यावर पुन्हा इंजिनचं चिन्हं आणण्यामागे दोन कारणं सांगितली जात आहेत. एक म्हणजे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीत मनसेला दमदारपणे उतरायचं आहे. त्यासाठी मनसेने जय्यत तयारी सुरू केली आहे. अशावेळी सभा, मेळावे घेताना पक्षाचं चिन्हंही लोकांपर्यंत गेलं पाहिजे. किंबहुना हे चिन्हं लोकांच्या नजरेसमोर सतत असले पाहिजे त्यासाठी मनसेने झेंड्यावर रेल्वे इंजिनचं चिन्हं घेतल्याचं सांगितलं जात आहे. झेंड्यावर पक्षाचं चिन्हं घेतल्याने मतदारांच्या मनावर चिन्हं कोरलं जातं. कोणत्या पक्षाला वाढायचं असेल तर त्याचा झेंडा, चिन्हं आणि विचारधारा मतदारांपर्यंत वारंवार गेली पाहिजे. त्यामुळेही हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरं कारण म्हणजे राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यामुळेही कदाचित त्यांनी झेंड्यावर इंजिन चिन्हं घेतलं असावं, असं सांगितलं जातंय.

मनसेचा 2020 मध्ये आला नवीन झेडा

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून मनसेने 2020 मध्ये महाअधिवेशन आयोजित केलं होतं. त्यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. याच अधिवेशनापासून राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्त्वाची भूमिका घेत मनसेच्या भगव्या झेंड्यांचं अनावरण केलं होतं. त्यावर रेल्वे इंजिन ऐवजी राजमुद्रा घेतली होती. त्याखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं लिहिलं होतं. राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही प्रशासकीय मुद्रा आपल्या झेंड्यावर घेतली होती. त्यावेळी त्यांनी झेंड्याचं पावित्र्य जपण्याचं आवाहनही केलं होतं. मात्र, अवघ्या दोन वर्षातच मनसेने झेंडा बदलल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMumbaiमुंबईAurangabadऔरंगाबाद