शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व; ते कोणाची 'बी टीम' म्हणून काम करणार नाहीत-चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 15:58 IST

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावा, ठाण्याची सभा या दोन्ही ठिकाणी हिंदुत्वाच्या मुद्दयाला धरून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केली

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावा, ठाण्याची सभा या दोन्ही ठिकाणी हिंदुत्वाच्या मुद्दयाला धरून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केली. तसेच भोंग्याबाबत सरकारला अल्टिमेटम दिला आहे. यानंतर राज ठाकरे भाजपशी युती करणार का? ते भाजपची बी टीम आहेत अशा चर्चा विरोधी पक्षांमध्ये सुरु झाल्या आहेत. त्यावरच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व असून ते कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत असे फेसबुकच्या माध्यमातून सांगितले आहे. 

पाटील म्हणाले, राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यानंतर मनसे भाजपाची बी टीम असल्याचं खोटं महाविकास आघाडी आपल्या इको सिस्टीमच्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व असून ते कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत. 

खोटं पसरवण्यासाठी आघाडीची इको सिस्टीम 

महाविकास आघाडीने खोटं पसवरण्यासाठी इको सिस्टीम तयार केली आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते समान खोटं बोलून ते खरं कस आहे हे जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.  

युतीबाबत कुठलाही प्रस्ताव नाही 

राज ठाकरेंच्या हिंदुत्व मुद्दयाला धरून भाषणानंतर मनसे आणि भाजपची युती होणार. अशा चर्चाना उधाण आलय. त्यावर पाटील यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. आता सध्या तरी कुठलाही प्रस्ताव नाही. निर्णय केंद्राकडून घेतला जातो. आमची राज्याची १३ जणांची कोअर कमिटी आहे. ती जास्तीत जास्त  प्रस्ताव  पाठवण्याचे  काम करते.  पण तसा कोणताही निर्णय आम्ही घेतलेला नाही. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी