शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

Raj Thackeray In Pune : काय पोरकटपणा सुरूये समजत नाही, राज ठाकरेचा हिंदुत्वावरून मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 12:15 IST

"खरं हिंदुत्व काय आहे याचे रिझल्ट लोकांना हवे. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो," राज ठाकरे यांचं वक्तव्य.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या सभेदरम्यान अयोध्या दौरा, हिंदुत्व अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी हिंदुत्वावरून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. सध्या काय पोरकटपणा सुरू आहे हे समजत नाही, असं म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधला. 

“त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. सध्या काय पोरकटपणा सुरूये समजतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. तुम्ही काय वॉशिंग पावडर विकताय का? खरं हिंदुत्व काय आहे याचे रिझल्ट लोकांना हवे. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो,” असं राज ठाकरे म्हणाले. 

“उत्तर प्रदेश, बिहारचं जे बोलतायत त्या आंदोलनाला १२-१४ वर्ष झाली. महाराष्ट्रात रेल्वे भरती होती. त्यासाठी तिकडून हजारोनं लोकं महाराष्ट्रात रेल्वे स्टेशन्सवर आली. मी त्याचे फोटो पाहिले, पदाधिकाऱ्यांना त्यांच्याशी भेटून बोलण्यास सांगितलं. आमचे लोक भेटून बोलायला गेले होते. तिथे बोलताना, बाचाबाचीत तिथल्या एका मुलानं पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली. हे प्रकरण तिकडून सुरू झालं. महाराष्ट्रात रेल्वे भरती आहे याच्या जाहीराती इकडे नाही, त्याच्या जाहिराती उत्तर प्रदेश, बिहारमध्ये येत होत्या. तिकडे भरती होत असेल तर त्यांना मिळाल्या पाहिजे, महाराष्ट्रात होत असेल तर इथल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे,” असंही ते म्हणाले. जेव्हा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या तेव्हा त्यांनी स्थानिक भाषांमध्ये परीक्षा घेणार असं सांगितलं आणि त्यानंतर महाराष्ट्रातील हजारो लोकांना रेल्वेत नोकरी मिळाली.

कोणतं आंदोलन अर्धवट सोडलं?राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतात म्हणतात, कोणतं आंदोलन अर्धवट सोडलं हे सांगावं. टोलचं आंदोलन घेतलं, महाराष्ट्रातील ६४ ते ७० टोलनाके मनसेमुळे बंद झाली. बाकीच्या पक्षांची काही जबाबदारीच नाही का ? असा सवालही त्यांनी केला. पाकिस्तानी कलाकारांनाही हकलावून दिले, त्यावेळी हिंदुत्वाची पकपक करणारे कुठे होते असा सवालही त्यांनी केला. रझा अकादमीविरोधातही मोर्चा मनसेनं काढलं. उद्धव ठाकरेंनी एक सांगावं तुमच्या अंगावर आंदोलन केल्याची एक केस तरी आहे का?,  भूमिकाच कोणती घ्यायची नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसे