शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

राज ठाकरेंनी माझी गाडी चालवणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 14:50 IST

राज ठाकरे हे पुण्यात सभेसाठी आले असताना त्यांनी कार्यकर्त्याच्या गाडीचे उद्घाटन करत त्याच्या विनंतीचा मान ठेवला.

पुणे : विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असल्याने सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. राज ठाकरे आज पुण्यात सभा घेणार असून आजच्या सभेपासून ते प्रचाराचा नारळ फाेडणार आहेत. राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं नातं सर्वांना माहित आहे. ठाकरेंच्या एका कार्यकर्त्यांने दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी कार घेतली त्याचे उद्घाटन करण्याची विनंती त्याने ठाकरे यांना केली. ठाकरेंनी सुद्धा त्याच्या विनंतीला मान देत त्याची गाडी चालवून त्याला शुभेच्छा दिल्या. आपल्या नेत्याने आपल्या पहिल्या गाडीचे उद्घाटन केल्याने कार्यकर्त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. 

राज ठाकरे यांची सभा आज पुण्यातील नातू बागेतील मैदानात हाेत आहे. त्यासाठी राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर त्यांनी मनसेचे काेथरुडचे उमेदवार किशाेर शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घान केले. दसऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा उपाध्यक्ष सचिन ननावरे याने नवी कार घेतली हाेती. त्या कारचे उद्घाटन राज ठाकरे यांनी करावे अशी त्याची इच्छा हाेती. तशी विनंती देखील त्याने राज ठाकरेंना केली. त्याच्या विनंतीचा मान ठेवत ठाकरे यांनी त्याला गाडी घेऊन त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी येण्यास सांगितले. त्यानुसार आज सकाळी ठाकरे यांनी ननावरे याची गाडी चालवत त्याला शुभेच्छा दिल्या. एका सामान्य कार्यकर्त्याचा मान राखत ठाकरेंनी गाडी चालविल्याने ननावरे याला अत्यंत आनंद झाला. 

लाेकमतशी बाेलताना सचिन ननावरे म्हणाला, दसऱ्याच्या मुुहुर्तावर मी नवी कार घेतली हाेती. त्या गाडीचे उद्घाटन राज साहेबांनी करावे अशी माझी इच्छा हाेती. मी त्यांच्याजवळ बाेलून दाखवली. माझ्या विनंतीला मान देत राज साहेबांनी आज माझ्या गाडीचे उद्घाटन केले. माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची गाडी साहेबांनी चालविल्याने माझा आनंद द्विगुणीत झाला आहे. 

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे