शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात राज ठाकरे 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेगा बैठकीत ठरला 'मास्टर प्लॅन' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 13:35 IST

मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांच्या धर्तीवर 'एकला चलो रे 'ची भूमिका घेण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना केली आहे.

प्राची कुलकर्णी -

पुणे : मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आता पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांकडे गांभीर्याने आपला मोर्चा वळविला आहे. त्याच धर्तीवर राज ठाकरे शुक्रवारी (दि. ५ ) सकाळी 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये पाहायला मिळाले. आत्तापासूनच त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीत लक्ष घालत जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात देखील केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यातील त्यांच्या 'राजमहल' या निवास्थानामध्ये मनसे शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात शहरातील पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. निवडणुकीच्या तयारीला लागायची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे. यावेळी मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांच्या धर्तीवर 'एकला चलो रे 'ची भूमिका घेण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना केली आहे. 

दरम्यान, मनसेने पुन्हा एकदा सेनेच्या सुरुवातीच्या धोरणांचा अवलंब करायला सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकांसाठी प्रत्येक मतदार यादीसाठी राजदूत नेमत त्यांच्या माध्यमातुन जास्तीत जास्त मतदारांपर्यॅत पोहोचायचं टार्गेट पदाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातल्या त्यांच्या 'राजमहल' या निवास्थानामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी सध्याचा परिस्थितीचा आढावा घेतानाच निवडुकीच्या तयारीला लागायची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच अयोध्येचा दौरा करणार आहेत. पक्ष पुन्हा हिंदुत्वाच्या मार्गाने जात असतानाच भाजप मनसे युतीची चर्चाही सुरु झाली आहे. पण महापालिका निवडणुकांसाठी युती केल्यास पुण्यात पक्षाला फटका बसेल असं सांगत मनसेच्या पुण्यातल्या पदाधिकार्यांनी मात्र एकला चलो रे चं धोरण स्विकारायची विनंती पक्षाध्यक्षांना केली आहे. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना सांगितलं  “ भाजपची महापालिकेचा एकहाती सत्ता आहे. त्यांच्याबरोबर गेल्यास आमच्या हाती काहीच लागणार नाही. म्हणून स्वतंत्र लढावे अशी भूमिका आम्ही मांडली आहे. पण याचा निर्णय मात्र अगदी निवडणुकी आधीच्या शेवटच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे.” 

दरम्यान, मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गावर चालायला सुरुवात केली आहे. हिंदुत्वाचा मात्र स्विकारतानाच सेनेच्या शाखांच्या धर्तीवर राज-दूतांची नियुक्ती करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. भाजपच्या पन्नाप्रमुखांप्रमाणेच हे राजदूत काम करतील. दर आठशे लोकांमागे नेमलेल्या या राजदूतांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यॅत पोहोचायचा प्रयत्न करायचे आदेश ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले. तसंच लवकरच या राजदूतांची नेमणुक पुर्ण करुन त्यांच्यासाठी एक शिबीर घेण्याचे नियोजनही यावेळी करण्यात आले. 

या बैठकीत मनसे पुन्हा हिंदुत्वाकडे वळल्यामुळे आनंदी असल्याचे सांगत आपल्यालाही अयोध्येला येऊ द्यावे ही विनंती पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंकडे केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणRaj Thackerayराज ठाकरेElectionनिवडणूकMNSमनसे