शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

‘सुवर्णरत्न’मध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग '

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 03:22 IST

सोसायटीमध्ये पाण्याची समस्या गंभीर बनली होती. त्यामुळे सोसायटीधारकांनी एकत्र येऊन रेनवॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम

पुणे : सोसायटीमध्ये पाण्याची समस्या गंभीर बनली होती. त्यामुळे सोसायटीधारकांनी एकत्र येऊन रेनवॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सध्या सोसायटीत पाणीटंचाई भासत नाही. हा उपक्रम कर्वेनगर परिसरातील सुवर्णरत्न गार्डन सोसायटीमध्ये करण्यात आला आहे.कमिन्स कॉलेज रस्त्यावरील सुवर्णरत्न गार्डन सोसायटीची स्थापना २००६ च्यादरम्यान झाली. सोसायटीतील ७ इमारतींमध्ये साधारण २०० सदनिका आहेत. सोसायटीतील सभासद मोठ्या उत्साहाने अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात. सोसायटीने पर्यावरणपूरक उपक्रमांना कायमच प्राधान्य दिले आहे. सोसायटीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली होती. सोसायटीच्या अध्यक्षा मंजूश्री खर्डेकर आणि सचिव स्मिता ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद अनेक आदर्श उपक्रम राबवित असतात.घनकचरा व्यवस्थापन शहरातील कचरा समस्या गुंतागुंतीची बनली आहे. त्याकरिता सोसायटीच्या सभासदांनी पुढाकार घेऊन १० लाख रुपयांचा कचरा विघटन प्रकल्पाचे तीन वर्षांपूर्वी उद्घाटन करण्यात आले होते. या प्रकल्पातून २०० सदनिकांमधून येणाऱ्या ओल्या कचºयाचे विघटन केले जाते आणि त्यातून निर्माण होणाºया खताचा वापर वृक्ष - रोपांच्या संवर्धनासाठी केला जातो.यामुळे पालिकेच्या मिळकत करात ५ टक्केइतकी सवलत सदनिकाधारकांना मिळत आहे. ई-कचरा व्यवस्थापन घनकचºयासोबतच २१ व्या शतकात ई-कचºयाचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू पाहत आहे. त्यामुळे सोसायटीच्या सभासदांचा ई-कचरा एकत्र केला जातो. नंतर त्याचे व्यवस्थापन करणाºया कमिन्स इंडिया आणि स्वच्छ या संस्थेकडे जमा करण्यात येते.टाकाऊ वस्तूंपासून समाजसेवी उपक्रम सोसायटीच्या सभासदांकडून कामात न येणाºया रद्दी, वस्तू किंवा कपडे सामाजिक संस्थांना दिले जातात. त्यातून गरजूंना मदत केली जाते. रेनवॉटर हार्वेस्टिंग सोसायटीने कमिन्स इंडिया आणि शाश्वत इको सोल्युशन फाऊंडेशनच्या सहकार्याने रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारला आहे. भू-जल पुनर्भरणामुळे सोसायटीतील बोअरवेल उन्हाळ्यातही आटत नाहीत. मुबलक पाणी उपलब्ध होते. यामुळे सोसायटीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.स्वच्छता जागृती सोसायटीच्या परिसरात विशेष स्वच्छता राखली जाते आणि प्रत्येक सभासद त्यासाठी प्रयत्न करीत असतो. सोसायटी परिसरात असलेल्या कचरा पेट्यांमध्येच कचरा टाकला जातो. त्यामुळे सभासदांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते.सांस्कृतिक उपक्रमसुवर्णरत्न सोसायटी सामाजिक कामात आणि स्वच्छतेतबाबत अग्रेसर असते. वर्षभरात सर्व धार्मिक, सामाजिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. स्वातंत्र्यदिवस, गणतंत्रदिवस, गणेशोत्सव, नवरात्री, दहिहंडी उत्सवांमध्ये तर आनंदाला पर्वणीच असते. सभासदांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. विशेष म्हणजे आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन केले जाते. यासाठी सोसायटीचे स्वत:चे भजनी मंडळ आहे.आरोग्य-शिबिरसोसायटीतील सभासदांच्या आरोग्याची काळजी म्हणून वर्षातून एक-दोनदा नियमितपणे आरोग्य शिबिर आयोजित केले जातात. त्यात नेत्रतपासणी, रक्ततपासणी, रक्तदान इत्यादी आरोग्यविषयक तपासण्या केल्या जातात.पालिकेकडून अपेक्षाशहरातील अनेक सोसायट्यांमध्ये आता ओल्या कचºयाचे व्यवस्थापन केले जाते. परंतु त्यातून निर्माण होणाºया खताचे प्रमाण वापरापेक्षा जास्त होत आहे. पालिकेने या खताच्या व्यवस्थापनासाठी पुढाकार घ्यावा नाहीतर खताच्या कचºयाचा नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच ज्या सोसायटींमध्ये असे व्यवस्थापन होत नाही त्यांना याविषयी प्रशिक्षण द्यायला हवे. योग्य मार्गदर्शनाअभावी अनेक सोसायटींमधील सभासदांची इच्छा असूनही त्यांना प्रकल्प राबविणे शक्य झाले नाही, असे मत सुवर्णरत्न सोसायटीच्या अध्यक्षा मंजूश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले आहे.