शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

राज्यात पावसाचे पुनरागमन, मराठवाडा, विदर्भात सर्वदूर पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 21:04 IST

कोकणात मुसळधार तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सर्वदूर पावसाची शक्यता

पुणे : कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस पडत आहे़ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे़ कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील डहाणु १३०, अलिबाग, दापोली, मालवण,मुंंबई(कुलाबा) १२०, रामेश्वरी, रोहा ११०, रत्नागिरी १००, हर्णे, खेड, वेंगुर्ला ९०, चिपळूण, देवगड, लांजा, मंडणगड, मुरड, सावंतवाडी, श्रीवर्धन ८०मिमी पावसाची नोंद झाली होती़ 

मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा, पाथर्डी ७०, शेवगाव ६०, अहमदनगर, महाबळेश्वर ५०, राहुरी, तळोदा ४०, लोणावळा ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला़ मराठवाड्यातील अंबड, कैज ५०, अंबेजोगाई, मोमीनबाद, भोकरदन, पैठण, शिरुर कासार ४० मिमी पाऊस पडला़ विदर्भातील शेगाव,नागपूर १००, हिंगणा ९०, बाळापूर, खारंगा ८०, काटोल, साकोली ७०, आष्टी, चंद्रपूर, पौनी, खडक अर्जुनी, सेलू ६० मिमी पावसाची नोंद झाली होती़ या शिवाय बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे़ घाटमाथ्यावरील धारावी १६०, ताम्हिणी १००, कोयना (पोफळी) ९०, भिरा ७०, दावडी ५० मिमी पाऊस पडला़ इशारा : १६ जुलै कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़ विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ १७ जुलै रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ दिवसभरात मुंबई, पणजी, चंद्रपूरला जोरदार वृष्टीबुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबई(कुलाबा) ३९, सांताक्रुझ ८०, अलिबाग १४, रत्नागिरी २९, पणजी ६३, डहाणु १९, महाबळेश्वर १९, जळगाव ५०, सांगली १०, अकोला १०, बुलढाणा २२, चंद्रपूर ६५, ब्रम्हपूरी २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे़ १६ जुलै रोजी नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरातील तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे़ धुळे, कोल्हापूर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे़ विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़

टॅग्स :RainपाऊसMumbaiमुंबई