शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पावसाने केला एक हजार मिमीचा टप्पा पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 09:39 IST

सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांवर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

पुणे : सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांवर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शहरात यंदा पावसाने १  हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. १ जूनपासून बुधवारी सकाळपर्यंत तब्बल १०१८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात पुणे शहरात ८७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने पुणे शहरात २४ ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. पार्किंगमध्ये व घरामध्ये पाणी शिरले होते. या पावसाबरोबर जोरदार वाऱ्यामुळे १३ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या.मंगळवारी पहाटे सव्वा ते दोन वाजेपर्यंतच्या एका तासात तब्बल ४६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर मंगळवारी दिवसभर लख्ख उन्हे पडली होती. दिवसाचे तापमानही वाढले होते. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत ८.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर पुढच्या दोन तासात शहराच्या सर्वच भागात जोरदार पाऊस सुरु होता. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ५४.३ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. पहाटे अडीचपर्यंत १९.२ मिमी आणि त्यानंतर सकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे रात्र असूनही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोडी झाल्याचे दिसून येत होते. भर पावसात पोलीस ही कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करीत होते.पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रापेक्षा पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात पावसाचा जोर अधिक होता. आज सकाळी आठ वाजेपर्यंत खडकवासला ७५, पानशेत ५९, वरसगाव ५७, टेमघर ५२, कासारसाई, कळमोडी  ७१, भाटघर ६८, पुरंदरमधील नाझरे धरणात ६२ मिमी पावसानी नोंद झाली होती. शहरात १३ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून झाडे पडण्यबरोबरच पाणी साचल्याने रस्ते ठप्प झाले होते. रात्रभर अग्निशामन दलाचे जवान हे झाडे दूर करण्याचे काम करीत होते. शहरात सर्वच ठिकाणाहून सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी घरात शिरले होते. त्यामुळे लोकांना हे पाणी बाहेर काढण्यात रात्र जागून काढावी लागली.कोंढवा येथील अंगराज ढाबा येथे रस्त्यावर इतके पाणी साचले होते की अनेक दुचाक्या, मोटारी पाण्याखाली गेल्या होत्या. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात गाड्या घातल्याने त्या बंद पडल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या.

टॅग्स :Puneपुणे