शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पावसाचे धुमशान : कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील आर्द्रतेने मुंबईवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 03:43 IST

तीन दिवसांपासून तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील आर्द्रता यांमुळे मुंबई व कोकण परिसरात मोठ्या प्रमाणावर ढगांची निर्मिती होऊन अतिवृष्टी झाल्याचे हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले. 

पुणे, दि.31 -  तीन दिवसांपासून तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील आर्द्रता यांमुळे मुंबई व कोकण परिसरात मोठ्या प्रमाणावर ढगांची निर्मिती होऊन अतिवृष्टी झाल्याचे हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले. त्यातील काही ढगांची उंची ही ९ किलोमीटरपर्यंत गेली होती़.पुणे हवामान विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. श्रीवास्तव म्हणाले, ‘‘२७ आॅगस्टला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. ते २८ आॅगस्टला छत्तीसगडला आले. २९ आॅगस्टला मध्य प्रदेशाच्या पुढे आले. त्याच वेळी अरबी समुद्रातून दुस-यांदा अतितीव्र स्वरूपाची ढगनिर्मिती होत होती़. याचा परिणाम होऊन मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर वृष्टी झाली़ काही ढगांची उंची ही ९ किमीपर्यंत होती़ पण, चक्रीवादळात, गडगडाटासह वादळी पावसाच्या काळात ढगांची उंची १२ ते १४ किमी असते़’’ ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, ‘‘मुंबईपासून ५० किमी अंतरावर समुद्रात या ढगांची निर्मिती झाली़ जमिनीपासून साधारण १ कि. मी.वर ढग सुरू होतात. तेथून पुढे त्यांची उंची १२ किमी होती़ काही ढग हे ८ ते ९ किमी उंचीचे होते़ यात सातत्य असल्याने केवळ मुंबईच नाही तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस झाला़ सर्वसाधारणपणे ढगांची उंची ही ८ किमीपर्यंत गेल्यानंतर त्यात वीज व गारांची निर्मिती होती. त्यामुळे या ढगांमधून समुद्रात वीज पडण्याच्या अनेक घटना घडल्या असून त्याची नोंद मुंबईतील रडारवर नोंदविली गेली आहे.’’२००५च्या तुलनेत एकतृतीयांश पाऊस...डॉ. कुलकर्णी यांनी २६ जुलै २००५ रोजी झालेल्या पावसाचाही अभ्यास केला होता़ याबाबत त्या वेळी ढगांची निर्मिती मुंबईच्या जवळ झाली होती; त्यामुळे समुद्रात पडणारा पाऊस कमी झाला व तो सर्व मुंबईमध्ये झाला़ २००५मध्ये ढग निर्माण होण्याची प्रक्रिया ही दिवसभर सुरू होती़. त्यामुळे तेव्हा ९४४ मिमी पाऊस झाला होता़ तेव्हाच्या तुलनेत यंदा पडलेला पाऊस हा ३० टक्केच आहे.

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार