धरणक्षेत्रात रात्री पावसाचा जोर, पवना धरणक्षेत्रात २४ तासांत २८४ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:37 AM2018-07-18T01:37:33+5:302018-07-18T01:38:37+5:30

धरण पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (दि. १७) पावसाचा जोर काहीसा ओसरला; मात्र सोमवारी रात्रभर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पाणीपातळीत चांगली वाढ होत आहे.

Rainfall during the monsoon, 284 mm of rain in 24 hours in Pawana dam area | धरणक्षेत्रात रात्री पावसाचा जोर, पवना धरणक्षेत्रात २४ तासांत २८४ मिमी पाऊस

धरणक्षेत्रात रात्री पावसाचा जोर, पवना धरणक्षेत्रात २४ तासांत २८४ मिमी पाऊस

Next

पुणे : जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (दि. १७) पावसाचा जोर काहीसा ओसरला; मात्र सोमवारी रात्रभर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पाणीपातळीत चांगली वाढ होत आहे. खडकवासला धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. जिल्ह्यात पवना धरणक्षेत्रात चोवीस तासांत तब्बल २८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पवना धरणक्षेत्रात ६१, तर त्या पूर्वीच्या पंधरा तासांत २२३ मिलिमीटर पाऊस झाला. वरसगाव धरणक्षेत्रात मंगळवारी दिवसभरात टेमघर ६९, वरसगाव ३५, पानशेत ३२ आणि खडकवासला परिसरात ६ मिलिमीटर पाऊस झाला, तर मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत टेमघरला १२३, वरसगाव १५५, पानशेत १५१ आणि खडकवासला येथे ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रात्रभर झालेल्या चांगल्या पावसामुळे मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून २०.२४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला
होता. सोमवारी या धरणांत
१८.५८ टीएमसी साठा होता. म्हणजेच, त्यात चोवीस तासांत १.६६ टीएमसीने वाढ झाली.
मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यातील पिंपळगाव जोगे ४, माणिकडोह २, डिंभे १०, कळमोडी ८, चासकमान ६, भामाआसखेड ४, वडिवळे ४५, आंद्रा १७, कासारसाई १०, गुंजवणी ११, नीरा देवघर १७ आणि भाटघरला १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली; मात्र मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पिंपळगाव जोगे ३६, माणिकडोह ५६, येडगाव ५१, वडज २८, डिंभे ६७, कळमोडी १०५, चासकमान ७२, भामाआसखेड २६, वडिवळे १०८, आंद्रा ५५, कासारसाई ६८, मुळशी १७२, गुंजवणी ९३, नीरा देवघर १०५, भाटघर ४९, वीर ३२, नाझरे २६ आणि उजनीला १४ मिलिमीटर पाऊस झाला.
खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने मंगळवारी सकाळी धरणातून मुठा नदीत १८ हजार ४९१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सायंकाळी पाचपर्यंत पाण्याचा विसर्ग ४ हजार ७०८ क्युसेक्सपर्यंत खाली आणण्यात आला. कळमोडी धरण भरल्याने त्यातून १ हजार २७० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. जिल्ह्यातून पाणी विसर्ग होत असल्याने उजनीतील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.
>धरणाचे नाव पाणीपातळी टक्केवारी
(टीएमसीमध्ये)
कळमोडी १.५१ १००
चासकमान ६.०६ ८०.०६
भामा आसखेड ५.०२ ६५.५१
आंद्रा २.५१ ८५.८९
पवना ६.६४ ७८.०८
मुळशी १३.४७ ७२.९८
टेमघर २.०८ ५५.९८
वरसगाव ७.२२ ५६.३३
पानशेत ८.९७ ८४.२०
खडकवासला १.९७ १००
गुंजवणी २.३७ ६४.३५
नीरा देवघर ६.६० ५६.३२
भाटघर १४.१३ ६०.१४

Web Title: Rainfall during the monsoon, 284 mm of rain in 24 hours in Pawana dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.