कुकडी प्रकल्पातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची दडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST2021-07-14T04:14:05+5:302021-07-14T04:14:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डिंभे : कुकडी प्रकल्पातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली आहे. यामुळे प्रकल्पातील पाचही धरणांच्या ...

कुकडी प्रकल्पातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची दडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डिंभे : कुकडी प्रकल्पातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली आहे. यामुळे प्रकल्पातील पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात अत्यल्प वाढ झाली आहे. गेल्या महीना भरात प्रकल्पात जेमतेम अडिच टीएमसी एवढीच वाढ झाली आहे. आज मितीस कुकडी प्रकल्पात केवळ १७.८२ टक्के एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे.
पाणलोटक्षेत्रात पावसाची दडी व प्रकल्पातील निचांकी पाणीसाठ्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण आणि जुन्नर तालुक्यातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव या पाच धरणांचा मिळून कुकडी प्रकल्प तयार झाला आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातीळ आंबेगाव, जुन्नर, शिरूर व अहमदनगर जिल्हयातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तसेच सोलापूर जिल्ह्यातीळ करमाळा अशा एकुण ७ तालुक्यातील सुमारे १ लाख ५६ हजार २७८ एवढे मोठे क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात प्रकल्पात कमी पाणीसाठा असूनही कुकडी पाटबंधारे विभागाने पाणी वाटपाचे योग्या नियोजन केल्याने लाभ क्षेत्रातील तालुक्यांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या नाहीत. मात्र, सोडण्यात आलेल्या आवर्तनांमुळे प्रकल्पातील धरणांनी तळ गाठला. पावसाळा सुरु होताच धरणांतील पाणीसाठे वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, धरणपाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने खालावलेले धरणसाठे शेतकऱ्यांच्या काळजाचे ठोके चुकवत आहेत.
प्रकल्पातील साठा
येडगाव धरण : धरणात आजमितीस ४५.५३ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. धरण पाणलोट क्षेत्रात ११८ मी.मी एवढा पाऊस झाला. धरणाची पाणीपातळी ६३८.१४० एवढी आहे.
माणिकडोह : या धरणात आजमितीस १०.५३ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. धरण पाणलोट क्षेत्रात १६४ मी.मी एवढा पाऊस झाला. धरणाची पाणीपातळी ६८९.६९० एवढी झाली आहे.
वडज : या धरणात आजमितीस ३६.०९ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. धरण पाणलोट क्षेत्रात १२८ मी.मी एवढा पाऊस झाला. धरणाची पाणीपातळी ७११.६५० एवढी झाली आहे.
पिंपळगांव जोगा : या धरणात आजमितीस उणे ५९.४१ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. धरण पाणलोट क्षेत्रात २२६ मी.मी एवढा पाऊस झाला असून धरणाची पाणीपातळी ६७८.१४० एवढी झाली आहे.
डिंभे : या धरणात आजमितीस २३.२९ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. धरण पाणलोट क्षेत्रात २४२ मी.मी एवढा पाऊस झाला. धरणाची पाणीपातळी ६९७.६८० एवढी झाली आहे.
विसापुर : या धरणात आजमितीस ९.११ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. धरण पाणलोट क्षेत्रात ७४ मी.मी एवढा पाऊस झाला. धरणाची पाणीपातळी ६०१.७०० एवढी झाली आहे.
चिल्हेवाडी - या धरणात आजमितीस १८.८९ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. धरण पाणलोट क्षेत्रात २९ मी.मी एवढा पाऊस झाला असून धरणाची पाणीपातळी ७१३.४०० एवढी झाली आहे.
चौकट
प्रकल्पात एकुण १७.८२ एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेला प्रकल्पात १९.०५ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. प्रकल्पातील अत्यल्प पाणीसाठा व पावसाने मारलेली दडी यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. भातलागवडी खोळंबल्या असून रब्बी पीकांनाही पावसाची गरज असल्योन शेकऱ्यांचे डोळे अकाशाकडे लागून राहीले आहेत.
फोटो कुकडीप्र्रकल्पात प्रकल्पात सध्या केवळ १७.८२ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक राहीला असून प्रकल्पातील डिंभे धरणात केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. आहे. (छायाचित्र-कांताराम भवारी.)