बालरंजन केंद्रात ‘गाण्यांचा पाऊस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:10 AM2021-01-25T04:10:08+5:302021-01-25T04:10:08+5:30

या वेळी डॉ. निर्मला सारडा, बालरंजन केंद्राच्या संचालिका तथा पालिकेच्या महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे, याप्रसंगी रजनी ...

'Rain of Songs' at Balaranjan Kendra | बालरंजन केंद्रात ‘गाण्यांचा पाऊस’

बालरंजन केंद्रात ‘गाण्यांचा पाऊस’

Next

या वेळी डॉ. निर्मला सारडा, बालरंजन केंद्राच्या संचालिका तथा पालिकेच्या महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे, याप्रसंगी रजनी शहा, सुमन शिरवटकर, सुषमा दातार व राजू बोकील उपस्थित होते. उपस्थित होत्या. डॉ. सारडा यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. आजवर प्रकाशित करण्यात आलेल्या चारही पुस्तकांमधून बालरंजन केंद्राने एकूण ४५० आनंदगाण्यांचा खजिना मुलांसाठी खुला केला आहे. गाण्यातून मुलांना अनेक नवे शब्द भेटतात, त्यांची भाषा समृद्ध होते. त्याचबरोबर ताल, लय, ध्वनीची गम्मत मुलांना कळते. गाणी म्हणताना त्यांचे रंजन होते. सामुदायिकरीत्या ती म्हटली तर चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. ही गाणी मुलांना अपरिमित आनंद देतात असे सहस्त्रबुध्दे म्हणाल्या.

ढग, पाऊस, चांदोबा, परी,बाहुली, प्राणी, पक्षी या विषयावरच्या कविता पुस्तकात आहेत. तसेच स्वच्छता अभियान, गुगल , कॉम्प्युटर आणि अगदी लॉकडाऊनच्या काळातील गमती जमतीचाही समावेश आहे. मुलांना भावेल असे छानसे मुखपृष्ठही पुस्तकाला लाभले आहे. त्यामुळे ते मुलांच्या पसंतीस नक्की उतरेल असे संचालिका सहस्रबुद्धे म्हणाल्या.

आशा होनवाद यांनी प्रास्ताविक केले, तर दिली बोरा यांनी आभार मानले.

Web Title: 'Rain of Songs' at Balaranjan Kendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.